BMC BUDGET : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

By admin | Published: March 29, 2017 02:31 PM2017-03-29T14:31:47+5:302017-03-29T14:33:12+5:30

मुंबई महापालिकेचा 2017 -18 वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीसमोर सादर केला.

BMC BUDGET: Mumbai Municipal Corporation budget presented | BMC BUDGET : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

BMC BUDGET : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबई महापालिकेचा 2017 -18  वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीसमोर सादर केला. जकातबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. पारदर्शक कारभार, जबाबदारी, काटकसर, विकास आराखड्याशी संलग्नता, आर्थिक स्त्रोतांचा सुयोग्य या पाच मुख्य मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले. 
 
शिवाय, गेल्या वर्षभरात महापालिकेने आधुनिक कारभारावर भर दिला आहे. मुंबईकरांना उत्तम सुविधा देण्यास प्रशासन बांधिल असेल, असेही ते म्हणाले. 
 
 
- यंदाचा अर्थसंकल्प 11 हजार 911 कोटी रुपयांनी कमी आहे.
 
- गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूद
 
- कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद, संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 12 हजार कोटी रुपये 
 
- बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही 
 
आणखी बातम्या
 
(जीएसटीला उशिर झाल्याने देशाचे 12 लाख कोटींचे नुकसान)
 
(मुंबई मनपा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर)
 
 
 

Web Title: BMC BUDGET: Mumbai Municipal Corporation budget presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.