BMC ELECTION 2017 - भाजपा नाही लढवणार मुंबई महापौरपदाची निवडणूक

By admin | Published: March 4, 2017 05:08 PM2017-03-04T17:08:18+5:302017-03-04T18:22:04+5:30

भाजपाने मुंबईच्या महापौरपदासह स्थायी समिती आणि अऩ्य कुठल्याही समित्याची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

BMC ELECTION 2017 - The BJP will not contest the election of the Mayoral post of the Mumbai Mayor | BMC ELECTION 2017 - भाजपा नाही लढवणार मुंबई महापौरपदाची निवडणूक

BMC ELECTION 2017 - भाजपा नाही लढवणार मुंबई महापौरपदाची निवडणूक

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 4 - मुंबई महापालिकेत दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाने मुंबईच्या महापौरपदासह स्थायी समिती किंवा अऩ्य कुठल्याही समित्याची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी दुपारी वर्षानिवासस्थानी पत्रकारपरिषदेत ही मोठी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
मुंबईच्या जनेतेने पारदर्शकतेला कौल दिला आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करुन महापौरपद मिळवणे ही फसवणूक ठरेल अशी स्पष्ट भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेत विकासाच्या मुद्यांवर शिवसेनेला भाजपा पाठिंबा देईल असे सांगितले.महापालिकेत भाजपाचे नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून बसतील. आम्ही विरोधी पक्षात बसणार नाही. सत्ताधारी शिवसेनेचे समर्थन करु पण पारदर्शकतेच्या मुद्यावर तडजोड करणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले. 
 
मनपाचे कायदे, कार्यपद्धती पाहण्यासाठी, मनपाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  भाजपापेक्षा शिवसेनेच्या दोन जागा जास्त मिळाल्या असल्या तरी, दोन्ही पक्षांना समान कौल आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाला मोठ यश मिळाले. आमच्या जागा 31 वरुन 82 पर्यंत वाढल्या.  पारदर्शकतेला मुंबईने कौल दिला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील नगरपालिका, जिल्हापरिषदा आणि महापालिका निवडणुकीत भाजपा राज्यातील नंबर 1 पक्ष ठरल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले तर, भाजपचे 82 नगरसेवक निवडून गेले. 
 

Web Title: BMC ELECTION 2017 - The BJP will not contest the election of the Mayoral post of the Mumbai Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.