BMC Election 2017: मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Published: February 20, 2017 05:44 PM2017-02-20T17:44:11+5:302017-02-20T20:21:43+5:30

आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

BMC Election 2017: Complaint against Shiv Sena Election Commission for Chief Minister | BMC Election 2017: मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

BMC Election 2017: मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आचारसंहिता काल दुपारी पाच वाजता संपली असतानाही छातीवर कमळाचं चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखतींचा धडाका लावलाय, हा सरकारी अधिकारांचा गैरवापर आहे, मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघनच आहे. त्यामुळे फडणवीसांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

(मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

 

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी यंत्रणा वापरून मुख्यमंत्री विरोधकांना धमकावत आहेत, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्याना राजकारणातली ही पारदर्शकता दिसत नाही का?  मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळत असेल तर सर्वाना परवानगी मिळायला हवी. दिवसभर सुरु असलेल्या मुलाखती या पेड न्यूजचा प्रकार असावा असा संशय आम्हाला आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्याना कोणी रोखलेले नाही. भारतीय जवानाबद्दल अशब्द काढणाऱ्या प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली असती तर आम्हाला आनंद वाटला असता, परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. 

प्रचाराची वेळ संपल्यानंतर कोणीही प्रचार करू नये असा नियम आहे. मात्र, वेळ संपल्यांनंतरही मुख्यमंत्र्यानी मुलाखती दिल्या आहेत, हा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, आम्ही निवडणूक आयोगाकडे याची रीतसर तक्रार केली आहे असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. 

(पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)

 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाने वेगळ लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाल्या.

Web Title: BMC Election 2017: Complaint against Shiv Sena Election Commission for Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.