BMC ELECTION 2017 - शिवसेनेचा वाघ येतोय
By admin | Published: February 23, 2017 11:05 AM2017-02-23T11:05:21+5:302017-02-23T11:08:42+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीचे मतमोजणीचे प्रारंभीचे कल पाहता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत शिवसेनेने आघाडी घेतली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीचे मतमोजणीचे प्रारंभीचे कल पाहता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये 10 जागांचे अंतर आहे. लोकसभा, विधानसभेमध्ये मनसेचे घसरलेले इंजिन महापालिकेतही रुळावर येण्याची शक्यता कमी आहे. मुंबईत शिवसेना 31, भाजपा 20 जागांवर आघाडीवर आहे.
मनसेचे एकमेवर उमेदवार किरण टाकळे आघाडीवर आहेत. ते भायखळा पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 208 मधून निवडणूक लढवत आहेत. वॉर्ड क्रमांक 202 मधून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या श्रध्दा जाधव आघाडीवर आहेत.
पक्षांतर्गत नाराजी फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. माटुंग्याच्या 178 मधून भाजपाच्या जेत्सल कोठारी आणि 179 मधून शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव आघाडीवर आहेत. भांडुपमध्ये भाजपाच्या साक्षी दिपक दळवी पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.