BMC Election : महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 08:54 PM2023-05-15T20:54:56+5:302023-05-15T20:55:32+5:30

BMC Election : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत.

BMC Election: Municipal elections will be held in October-November; Devendra Fadnavis said | BMC Election : महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

BMC Election : महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

googlenewsNext


BMC Election : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका निवडणुका(BMC Election) रखडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार, अशी विचारणा अनेकदा होत असते. पण, काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. पण, आता या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, असे मोठे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. काही कायदेशीर बाबींमुळे महापालिका निवडणुकांचे प्रकरण कोर्टात आहे. पण, आता फडणवीसांच्या वक्तव्यामुळे काहीसा स्पष्टपणा आला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे यांचीही माहिती
काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनीही ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, असे म्हटले होते. 7 मे रोजी बावनकुळे यांचा पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला. त्यावेळी निगडी येथे पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, महापालिका निवडणुका घेण्यासाठी आता पुरेसा वेळ नाही. पावसाळ्यात निवडणुका घेता येणे शक्य नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील. 

Web Title: BMC Election: Municipal elections will be held in October-November; Devendra Fadnavis said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.