BMC ELECTION RESULT : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार

By admin | Published: February 23, 2017 04:08 PM2017-02-23T16:08:36+5:302017-02-23T18:37:30+5:30

मुंबईतल्या गिरगाव, माहिमसारख्या मराठीबहुल भागात भाजपानं घवघवीत यश मिळवलं आहे. मुंबईत शिवसेनेची वाढ फुटपट्टीत झाली तर भाजपाची वाढ पटींनी झाल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.

BMC ELECTION RESULT: In Mumbai, the rise of the army in the sidewalk, the BJP's excesses - Ashish Shelar | BMC ELECTION RESULT : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार

BMC ELECTION RESULT : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - मुंबईतल्या गिरगाव, माहिमसारख्या मराठीबहुल भागात भाजपानं घवघवीत यश मिळवलं आहे. मुंबईत शिवसेनेची वाढ फुटपट्टीत झाली तर भाजपाची वाढ पटींनी झाल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. भाजपाला 81 जागा मिळाल्या असल्या तरी 4 अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे.त्यामुळे आमच्याकडे 85 जागा आहेत, अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. 
 
काँग्रेस आणि शिवसेनेनं मिळून मॅच फिक्सिंग केली होती. तरीही शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. भाजपानं 32 जागांवरून 82 जागांपर्यंत मजल मारली आहे. भाजपाच्या जागेत गेल्या वेळीपेक्षा दुपटीनं वाढ झाली आहे. भाजपाचा विजय हा मुंबईकरांना समर्पित करत असल्याचंही भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले आहेत.
 

Web Title: BMC ELECTION RESULT: In Mumbai, the rise of the army in the sidewalk, the BJP's excesses - Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.