BMC ELECTION RESULTS LIVE : मुंबईत कोण पुढे, कोण मागे
By admin | Published: February 23, 2017 10:34 AM2017-02-23T10:34:46+5:302017-02-23T12:38:08+5:30
मुंबईसह 10 महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. मुंबईकरांची साथ कोणत्या पक्षाला मिळणार, हे आज स्पष्ट होणार आहे.
मुंबईकर परिवर्तन घडवून आणणार का? याची उत्सुकता सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे.
LIVE UPDATE
वॉर्ड क्र. 202 : माजी महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांची डबल हॅटट्रिक, सलग सहाव्यांदा विजय
माहिमध्ये शिवसेनेचे मिलिंद वैद्यही विजयी
वॉर्ड क्र. 1 : तेजस्विनी घोसाळकर यांचा विजय
वॉर्ड क्रमांक 108 : किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा मुलुंडमध्ये विजय
वॉर्ड क्र. 126 : मनसेच्या अर्चना भालेराव विजयी
नाना आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले पराभूत, शिवसेनेच्या सिंधू मसूरकर विजयी
वॉर्ड क्र. 132 : भाजपाचे श्रीमंत उमेदवार पराग शहा विजयी, शहा यांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना 690 कोटी रुपयांची संपत्ती जारी केली होती
BJP MP Kirit Somaiya's son Neil wins from ward number 108 #BMCPolls2017pic.twitter.com/YZDbbwWphj
— ANI (@ANI_news) February 23, 2017
किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या
यंत्रणा सज्ज
यंदाच्या पालिका निवडणुकी एकूण 91,80,491 मतदारांपैकी 50,97,565 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याची मतमोजणी मुंबईतील 23 केंद्रांवर सुरू झाली आहे. यापूर्वी सर्व मतमोजणी केंद्रांवर सकाळी 6.30 वाजता मॉक ड्रिक घेण्यात आले. मतमोजणीसाठी पालिकेचे 966 कर्मचारी, 23 निवडणूक निर्णय अधिकारी व 23 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यरत आहेत. मतदानाची सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी 138 कर्मचारी आहेत.