नाताळच्या सुट्टया देताना मुंबई महापालिकेने केला भेदभाव
By admin | Published: December 26, 2016 10:57 AM2016-12-26T10:57:43+5:302016-12-26T11:08:06+5:30
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना नाताळच्या सुट्टया देताना महापालिकेने भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना नाताळच्या सुट्टया देताना महापालिकेने भेदभाव केल्याचा आरोप पत्रकार आणि प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
महापालिकेतर्फे चालवल्या जाणा-या मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना नाताळची सुट्टी मिळाली आहे पण उर्दू माध्यमाच्या शाळांना नाताळची सुट्टी देण्यात आलेली नाही. गलगली यांनी टि्वटरवरुन ही बाब निदर्शनास आणली आहे.
What a Nonsense going on #ChristmasVacation@MCGM_BMC declare holiday only for Marathi & Hindi Medium Student's. Urdu Medium no Vacation
— ANIL GALGALI (@ANILGALGALIRTI) 26 December 2016