गडचिरोलीत प्राणहीता नदीत बोट उलटली, तीन बेपत्ता
By admin | Published: February 21, 2016 07:31 PM2016-02-21T19:31:54+5:302016-02-21T19:35:50+5:30
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कालेश्वर पीएस महादेवपूर येथील प्राणहीता नदीत रविवारी एक बोट पलटी झाली.
Next
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. २१- महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कालेश्वर पीएस महादेवपूर येथील प्राणहीता नदीत रविवारी एक बोट पलटी झाली. या बोटीमध्ये एकूण २२ जण होते. त्यातील १९ जणांना वाचवण्यात यश आले असून, एक मुलगा आणि दोन महिलांसह तीन जण बेपत्ता आहेत.
महाराष्ट्रातून प्रवाशांना घेऊन तेलंगणातील गोदावरी नदीच्या तीराच्या दिशेने ही बोट निघाली होती. २२ प्रवाशांसह तीन दुचाकी या बोटीवर होत्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिस स्पीड बोट आणि लाईफ जॅकेटसह तिथे दाखल झाले.
तेलंगण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त एक मुलगा बेपत्ता आहे. या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांना कालेश्वर येथे उपचार देण्यात आले.
Boat capsizes in Pranhita River in Gadchiroli (Maharashtra). 22 rescued, 8-10 people still missing pic.twitter.com/kmGdcksNKX
— ANI (@ANI_news) February 21, 2016