तिलारी जंगल सफारीसाठी बोट दाखल; जॅकेट व अन्य सुविधा असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:39 AM2020-06-29T00:39:33+5:302020-06-29T00:39:46+5:30

चांदा ते बांदा योजना : पावसाळ्यानंतर पर्यटनाला पूरक ठरणार बोट

Boat ride for Tilari jungle safari; There will be jackets and other amenities | तिलारी जंगल सफारीसाठी बोट दाखल; जॅकेट व अन्य सुविधा असणार

तिलारी जंगल सफारीसाठी बोट दाखल; जॅकेट व अन्य सुविधा असणार

googlenewsNext

सावंतवाडी : तिलारी आंतरराज्य प्रकल्प पर्यटन आणि जंगल सफारीसाठी चांदा ते बांदा योजनेतून तिलारी जंगल सफारी बोट उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यावर पावसाळ्यानंतर पर्यटनाला ही बोट पूरक ठरणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर ही बोट पर्यटनासाठी उपयुक्त ठरणार आहे. हेवाळे येथील संस्थेकडे ती सुपुर्द करण्यात आली आहे. माजी अर्थराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेतून पाच लाख रुपये दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना मंजूर केले होते. यामधून १२ प्रवासी वाहतुकीची इंजिन असणारी बोट निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये दहा पर्यटक बसतील. त्यांच्यासाठी जॅकेट व अन्य सुविधादेखील असतील, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.

तिलारी पाटबंधारे धरणाच्या ठिकाणी जंगल सफारीसाठी पर्यटकांना ही बोट उपयुक्त असून ‘तिलारी जंगल सफारी’ असे या बोटीचे नामकरण करण्यात आले आहे. वनखात्यासाठी जंगलाच्या संरक्षणालादेखील या बोटीचा फायदा होईल, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी सांगितले.

सध्या कोरोनामुळे सर्वच ठिकाणचे पर्यटन बंद आहे. त्यामुळे ज्यावेळी सर्व व्यवहार सुरळीत होतील, त्यावेळी या बोटीचा वापर पर्यटकांसाठी करण्यात येणार आहे. तिलारी खोऱ्यात असलेले पर्यटन सौंदर्य या बोटीच्या माध्यमातून पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. त्यामुळे शासनाने या बोटीला मंजुरी दिली आहे, असेही समाधान चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Boat ride for Tilari jungle safari; There will be jackets and other amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन