साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

By admin | Published: October 23, 2015 02:59 AM2015-10-23T02:59:06+5:302015-10-23T02:59:06+5:30

शतकपूर्तीच्या निकट पोहोचलेल्या साईबाबांच्या ९७ व्या पुण्यतिथीला गुरुवारी देश-विदेशातील भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले़ साई पुण्यतिथीचे महत्त्वाचे अंग

Bodies of devotees to visit Sai | साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

Next

शिर्डी : शतकपूर्तीच्या निकट पोहोचलेल्या साईबाबांच्या ९७ व्या पुण्यतिथीला गुरुवारी देश-विदेशातील भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले़ साई पुण्यतिथीचे महत्त्वाचे अंग असलेला आराधना विधी गुरुवारी दुपारी माध्यान्ह आरतीपूर्वी साईसंस्थानचे अध्यक्ष व जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी व शर्मिला कुलकर्णी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने करण्यात आला़ तत्पूर्वी नऊ वाजता शहरातून भिक्षा झोळीचा कार्यक्रम झाला़
द्वारकामाईत सुरू झालेल्या अखंड साईसच्चरित्र पारायणाची गुरुवारी पहाटे सांगता झाली़ यानंतर साईप्रतिमा व साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली़ सकाळी १० वाजता अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी व शर्मिला कुलकर्णी यांच्या हस्ते समाधीची विधीवत पूजा करण्यात आली़ मंदिराशेजारील व्यासपीठावर समीहन चंद्रशेखर आठवले यांचे कीर्तन झाले़ दुपारी पाच वाजता परंपरेप्रमाणे साईबाबांच्या आगमनाची स्मृती जपणाऱ्या खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन कार्यक्रम झाला़, तसेच वाजतगाजत ग्रामदैवतांना सोने अर्पण करण्यात आले़

Web Title: Bodies of devotees to visit Sai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.