बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By Admin | Published: July 15, 2017 02:33 AM2017-07-15T02:33:21+5:302017-07-15T02:33:21+5:30

आग्रोली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी मध्यरात्री नेव्ही डायवर्सच्या मदतीने काढण्यात आला.

The bodies of the missing youth were found | बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आग्रोली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी मध्यरात्री नेव्ही डायवर्सच्या मदतीने काढण्यात आला. यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणा पुन्हा एकदा कुचकामी ठरल्याचे दिसून आले आहे. बुडालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पालिकेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने शोधकार्यात विलंब होत आहे.
शहरातील तलाव व खाडीमध्ये व्यक्ती बुडण्याच्या घटना सतत घडतात. मात्र, त्यांना पाण्याखाली शोधण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने शहराबाहेरील यंत्रणेची मदत घ्यावी लागते. गुरुवारी दुपारी आग्रोळीतील तलावात अजय गायकवाड (१९) हा तरुण बुडाला; परंतु बारा तास शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता. अखेर मुंबईतून नेव्हीच्या डायवर्स (जलतरणपट्टू)च्या पथकाने अर्ध्या तासाच्या प्रयत्नांती अजयचा मृतदेह बाहेर काढला.

Web Title: The bodies of the missing youth were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.