बोरघाटात मिळालेल्या मृतदेहाचा लागला छडा
By admin | Published: April 28, 2016 02:43 AM2016-04-28T02:43:35+5:302016-04-28T02:43:35+5:30
मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात १७ एप्रिल रोजी एका तरु णाचा कुजलेला मृतदेह आढळला होता.
खालापूर : मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात १७ एप्रिल रोजी एका तरु णाचा कुजलेला मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन करून त्याला खोपोलीत बेवारस दफनभूमीत पुरण्यात आले होते. तब्बल सव्वा महिन्यानंतर त्याची ओळख पटली असून, मंगळवारी मृतदेह बाहेर काढून तो त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. खून करून त्याचा मृतदेह या बोरघाटात टाकण्यात आला होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या मारेकऱ्यांना गुन्हे अन्वेषण शाखा, मुंबईने जेरबंद केल्याचीही माहिती मिळाली आहे.
दीपक गुराप्पा पवार (३५) असे त्याचे नाव आहे. तो कुर्ला येथे राहणारा होता. त्याचे वडील गुराप्पा पवार यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार दीपकचा कुर्ला भागात सुरू असलेल्या काही अवैध धंद्यांना विरोध होता. तो कायम त्याबाबत तक्र ार करीत असे. त्यामुळे अवैध धंदा करणाऱ्यांबरोबर त्याचे भांडण झाले होते. त्यांनी दीपकला ठार मारण्याची, गायब करण्याची धमकी दिली होती.
१४ एप्रिलला दीपक अचानक गायब झाला. कुर्ला पोलीस ठाण्यात तशी तक्र ार करण्यात आली, मात्र बेपत्ता असल्याची नोंद घेत महिनाभर संबंधित पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे पालकांनी क्र ाइम ब्रँचकडे तक्रार
केली.
गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि गुन्ह्याची उकल झाली. दीपकचा मृतदेह त्यांनी खून करून बोरघाटात टाकला होता, अशी कबुली मारेकऱ्यांनी दिली.
खोपोली पोलिसांना १७ एप्रिलला एका तरु णाचा मृतदेह बोरघाटात एचओसी पुलाच्या बाजूच्या दरीत झुडपाला अडकलेला मिळाला होता. मृतदेह कुजलेला असल्याने शवविच्छेदन करून खोपोली बेवारस दफनभूमीत पुरण्यात आला होता. मंगळवारी दीपकचे आई -वडील, पत्नी मुंबई पोलिसांसमवेत खोपोलीत आले होते. त्यांच्याकडे मृतदेह देण्यात आला. (वार्ताहर)