सात दिवस शोधत होते ते बहिणीचा मृतदेह
By admin | Published: August 6, 2014 11:15 PM2014-08-06T23:15:55+5:302014-08-06T23:15:55+5:30
माळीण दुर्घटनेला आठवडा झाला, तरी अनेक जण नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 145 मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असले, तरी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही.
Next
>मंचर : माळीण दुर्घटनेला आठवडा झाला, तरी अनेक जण नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 145 मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असले, तरी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही. आसाणो येथील पुरुषोत्तम रामचंद्र ढवळे यांच्या बहिणीचे कुटुंब ढिगा:याखाली सापडले. 6 जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून, ओळखही पटली आहे. बहीण तानूबाई (वय 69) व तिचा नातू सागर (वय 7) यांचे मृतदेह मिळालेले नाहीत, अशी माहिती ढवळे यांनी दिली. बुधवारी सकाळी ते परिसरात स्वत:च शोध घेत होते. अधिका:यांकडे विचारपूस करीत होते.
काही दिवसांपूर्वीच पुरुषोत्तम ढवळे बहिणीला भेटून गेले होते. घटना घडल्यानंतर आजर्पयत त्यांनी अनेकदा माळीण येथे हेलपाटे मारले. आजही हातात छत्री घेऊन ते दोन किलोमीटर अंतर पायी चालून बहिणीचा मृतदेह शोधण्यासाठी आले होते. शाळेसमोरील टाकीवर उभे राहून ते हताश नजरेने घटनास्थळाकडे पाहत होते. ते जिवंत असण्याची आता आशा नाही; निदान त्यांचे मृतदेह तरी मिळावेत, असे ढवळे म्हणाले. बहिणीच्या घरात ती स्वत:, सून भारती, गोरक्ष पोटे, 3 लहान मुली व मुलगा, असे सहा जण होते. सर्व जण गाडले गेले. इतरांचे मृतदेह मिळाले; मात्र बहीण तानूबाई व तिचा नातू सागर यांचे मृतदेह मिळाले नसल्याचे ढवळे म्हणाले.
गावातील मंदिरालगतच बहिणीचे घर होते. अडीवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अनेक मृतदेह पाहिले. मात्र, बहीण व तिचा नातू यांचे मृतदेह सापडले नाहीत. माझी मुले पुणो येथून येऊन त्यांनीही शोधाशोध केली, असे पुरुषोत्तम ढवळे म्हणाले. त्यांनी तेथील अधिका:यांशी संपर्क साधला. ढवळे यांना अनेक जण धीर देत होते. अनोळखी मृतदेह समजून त्यांना अग्नी देण्याअगोदर मला मृतदेह मिळावेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.(वार्ताहर)