शरीरसौष्टवपटू सुहास खामकरला लाचखोरीप्रकरणी अटक
By admin | Published: August 4, 2014 06:43 PM2014-08-04T18:43:56+5:302014-08-04T20:17:51+5:30
भारत श्री, मिस्टर इंडिया, आशिया श्री अशा पुरस्कारांवर नाव कोरणारा शरीरसौष्टवपटू सुहास खामकरला पनवेल पोलिसांनी लाचखोरीप्रकरणी अटक केली आहे
Next
ऑनलाइन टीम
पनवेल, दि. ४ - मिस्टर इंडिया, आशिया श्री अशा पुरस्कारांवर नाव कोरणारा शरीरसौष्टवपटू सुहास खामकरला पनवेल पोलिसांनी लाचखोरीप्रकरणी अटक केली आहे. पनवेलमध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करणा-या सुहासला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये मराठी झेंडा रोवणारा सुहास खामकर हा पनवेलमध्ये नायब तहसीलदारपदावर कार्यरत होता. सुहासने सात बारा उतारावर नाव टाकण्यासाठी एका ग्रामस्थाकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी पनवेल येथील अँटी करप्शन ब्यूरोकडे तक्रार दाखल झाली होती. सोमवारी अँटी करप्शन विभागाने सापळा रचून सुहास खामकरला अटक केली.