नगरमध्ये बोगस मतपत्रिका सापडल्या

By admin | Published: May 25, 2016 12:57 AM2016-05-25T00:57:14+5:302016-05-25T00:57:14+5:30

अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्सच्या निवडणुकीनंतर येथील मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या आणि शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्याने मंगळवारी गोंधळ उडाला.

Bogus ballot boxes were found in the city | नगरमध्ये बोगस मतपत्रिका सापडल्या

नगरमध्ये बोगस मतपत्रिका सापडल्या

Next

अहमदनगर : अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्सच्या निवडणुकीनंतर येथील मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या आणि शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्याने मंगळवारी गोंधळ उडाला. २५० मतपत्रिका पोलिसांनी जप्त केल्या असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष, चतुर्थ झोन व पंचम झोन प्रांतिय अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी रविवारी नगरमधील बडीसाजन मंगल कार्यालयात मतदान झाले. सोमवारी दुपारी चार वाजता मतमोजणी प्रक्रिया संपली. यामध्ये जय जिनेंद्र ग्रुप पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी विजय मिळविला. मंगळवारी दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या व शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्या. प्रत्येक मतपत्रिका पोलिसांनी गोळा केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. डी. डी. खाबिया यांना पोलिसांनी पाचारण केले. मतपत्रिकांची संयुक्तपणे तपासणी केली.

निवडणुकीमध्ये जशा मतपत्रिका छापल्या होत्या, तशाच मतपत्रिका छापून, झेरॉक्स करून त्यावर शिक्का मारून त्या मतदान केंद्राबाहेर फेकण्यात आल्या. हा खोडसाळपणाचा प्रकार आहे. मतदानासाठी एक लाख मतपत्रिका छापल्या होत्या. प्रत्येक मतपत्रिकेवर फुली असलेला शिक्का आणि त्यावर निवडणूक प्रक्रियेत असलेल्या प्रोसेडिंग आॅफिसरची स्वाक्षरी होती. सापडलेल्या मतपत्रिकांवर फक्त शिक्का होता आणि तो बनावट होता.
- डी. डी. खाबिया,
निवडणूक अधिकारी

Web Title: Bogus ballot boxes were found in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.