बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By admin | Published: October 4, 2015 02:34 AM2015-10-04T02:34:20+5:302015-10-04T02:34:20+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षापासून आतापर्यंत ३१ बोगस डॉक्टर जिल्ह्यात आढळले आहेत. त्यांच्यावर विविध
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षापासून आतापर्यंत ३१ बोगस डॉक्टर जिल्ह्यात आढळले आहेत. त्यांच्यावर विविध स्तरांवर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती नुकत्याच झालेल्या बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत देण्यात आली. ही समिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने स्थापन केली आहे.
सप्टेंबर २०१५ मध्ये भिवंडीत दोन बोगस डॉक्टर आढळले. इतर तालुक्यांत ही मोहीम सुरू आहे. गतवर्षी मुरबाडमध्ये १८ तर भिवंडीत ११ असे २९ बोगस डॉक्टर आढळले. याप्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही बोगस डॉक्टर कारवाईच्या भीतीने व्यवसाय बंद करून निघून गेले आहेत. नगरपालिका क्षेत्रातही ही शोधमोहीम सुरू करावी तसेच घरमालकांवरदेखील कार्यवाही करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विकास गजरे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी बी. आर. सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस प्रतिनिधी, आरोग्य पर्यवेक्षक आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)