बोगस विद्यार्थ्यांंनी सोडविले पेपर!
By admin | Published: December 6, 2015 02:27 AM2015-12-06T02:27:44+5:302015-12-06T02:27:44+5:30
टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार; एकाच विद्यार्थ्याने दिली तीन विद्यार्थ्यांंच्या नावावर परीक्षा.
वाशिम : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या टंकलेखन परीक्षेत एका बोगस परीक्षार्थ्याने चक्क तीन विद्यार्थ्यांंंच्या नावावर परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार ह्यलोकमतह्ण ने ५ डिसेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाला. या प्रकारामुळे टंकलेखन अर्थात ह्यटायपिंगह्णच्या परीक्षा किती गांभीर्याने घेतल्या जातात, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाशिम, कारंजा, मंगरुळपीर व मालेगाव येथे टंकलेखन परीक्षा केंद्र आहेत. वाशिम येथे तीन तर अन्य ठिकाणी प्रत्येकी एक, अशा एकूण ६ केंद्रांवर २ डिसेंबरपासून सकाळी ९ ते ४ वाजेदरम्यान इंग्रजी व मराठी ३0 व ४0 गती प्रति मिनिटची परीक्षा घेण्यात आली. शनिवारी वाशिम येथील तीन केंद्रांवर जवळपास ६ हजार ५२२ परीक्षाथ्यार्ंनी ही परीक्षा दिली. यामध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा २५९६, बाकलीवाल विद्यालय १६२६ तर जाधव विद्यालयात २३00 परीक्षाथ्यार्ंचा सहभाग होता.
या तीनही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांंच्या जागेवर बसून बोगस परीक्षार्थ्यांंंनी पेपर सोडविले. हा सर्व प्रकार टायपिंग इन्स्टीट्यूट , केंद्रसंचालक व परीक्षेशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणेच्या सहमतीने झाल्याची बाब या प्रकारामुळे अधोरेखित होते. ह्यलोकमत चमूह्ण ने विविध परीक्षा केंद्रांवर दिलेल्या भेटीत एका परीक्षा केंद्रावर तर वीस वर्षीय परीक्षार्थ्याच्या जागेवर टंकलेखनात पारंगत असलेला पन्नास वर्षीय इसम पेपर सोडवित असल्याचे दिसून आले. एका जणाने तर तीन जणांचे पेपर वेगवेगळ्य़ा वेळेत सोडविल्याचेही समोर आले. काही परीक्षा केंद्रावर टायपिंग इन्स्टीट्यूट केंद्र संचालकांचीही उपस्थिती आढळून आली.
*जिल्हा परिषद कन्या शाळा
वाशिम येथे टंकलेखन परीक्षेचे तीन केंद्र होते. या परीक्षा केंद्रांवर लोकमत चमूने भेट दिली असता, अनेक गैरप्रकार आढळून आले. जिल्हा परिषद कन्या शाळा जुन्या जिल्हा परिषद आवारात असून, या परीक्षा केंद्राकडे कुणाचेच लक्ष जात नाही. लोकमत चमूने दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी भेट दिली असता अनेक परीक्षार्थी बाहेर आढळून आलेत, तर त्यांच्या जागेवर अनेक ठिकाणी बोगस परीक्षार्थी पेपर सोडवित होते.
*बाकलीवाल विद्यालय
बाकलीवाल परीक्षा केंद्रावर लोकमत चमूने २.३0 वाजता भेट दिली. यावेळी बाकलीवाल केंद्रावरील अनेक शिक्षकांना लोकमतची चमू फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेचच बोगस परीक्षार्थ्यांंंना पळविण्याचा प्रयत्न क ेला; मात्र तेवढय़ातच चमू घटनास्थळी पोहोचली. यावेळी परीक्षा केंद्रातील खोल्या परीक्षार्थ्याविना आढळून आल्यात, तर काही परीक्षार्थ्यांंंची पाहणी केली असता बोगस विद्यार्थी आढळून आलेत.
*जाधव विद्यालय, लाखाळा
गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या जाधव विद्यालयामध्ये तर अनेक गंभीर प्रकार आढळून आले. तीन खोल्यांमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक खोलीमध्ये मोठय़ा प्रमाणात बोगस विद्यार्थी आढळून आलेत. एका खोलीत तर चक्क ५0 वर्षीय इसम एका २0 वर्षीय परीक्षार्थ्यांंंचा पेपर देताना आढळून आला, तसेच जवळपास १८ परीक्षार्थी बोगस आढळून आलेत. काही जण केंद्रप्रमुखासमोरुन पळून गेलेत.