बॉलिवूड दिग्दर्शिकेची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये ?

By admin | Published: June 9, 2017 08:57 AM2017-06-09T08:57:41+5:302017-06-09T08:57:41+5:30

मुंबईमध्ये एक सेक्स रॅकेट उघड झाल्याची माहिती समोर येते आहे.

Bollywood director girl's sex racket? | बॉलिवूड दिग्दर्शिकेची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये ?

बॉलिवूड दिग्दर्शिकेची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये ?

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9- नुकतंच मुंबईमध्ये एक सेक्स रॅकेट उघड झाल्याची माहिती समोर येते आहे. नवी मुंबईच्या वाशी भागात हे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, वाशी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये काही लोक सेक्स रॅकेट चालवत होतं. 
 
पोलिसांना या रॅकेटबद्दलची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तेथे सुरू असलेला प्रकार थांबविला. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे, तर तीन मुलींना सेक्स रॅकेटच्या जाळ्यातून वाचवायला पोलिसांना यश मिळालं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ज्या तीन मुलींना या रॅकेटमधून वाचविण्यात आलं त्यापैकी एक 19 वर्षीय मुलगी बॉलिवूडच्या एका सिने दिग्दर्शकाची मुलगी आहे. त्या मुलीने तीची आई सिनेसृष्टीत दिग्दर्शिका असल्याची माहिती दिली आहे. पण त्या दिग्दर्शिका नेमक्या कोण आहेत, या बद्दलची माहिती अजून मिळाली नाही. 
 
रॅकेटमधून वाचविण्यात आलेल्या मुलींच्या माहितीनुसार, त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकललं जात होतं.  त्यापैकी 16 वर्षाच्या दहावी पास असलेल्या मुलीला तीच्या आई-वडिलांनीच या व्यवसायात ढकललं होतं. याआधीसुद्धा सेक्स रॅकेटच्या घटना घडला आहेत  ज्यामध्ये कित्येक बॉलिवूडच्या अभिनेत्री पकडल्या गेल्या आहे. 
 
2014 मध्ये हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये पकडल्या गेलेल्या सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री  श्वेता प्रसाद बसुचं नाव समोर आलं होतं.  त्यानंतर दोन महीने त्यांना रेस्क्यू होममध्येसुद्धा ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर श्वेता बसुला हैदराबाद सेशन्स कोर्टाने क्लीन चिट दिली होती. अशाच एका प्रकरणात तामिळ अभिनेत्री आणि भरतनाट्यम डांन्सर सुकन्या हिला चेन्नईतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. 
 
हैदरामध्ये 23 ऑगस्ट 2010 मध्ये सगळ्यात मोठं सेक्स रॅकेट उघड झालं होतं.ज्यामध्ये 9 जण पकडले गेले होते. त्यात अभिनेत्री सायरा बानो यांचाही समावेश होता. 
 
 

Web Title: Bollywood director girl's sex racket?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.