बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचा आज स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:05 AM2017-07-18T11:05:33+5:302017-07-18T14:15:58+5:30

बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं जहाँपनाह, हम तो बस रंगमंच की कठपुतलियां हैं असं म्हणत प्रेक्षकांना सतत आनंद देणारा अभिनेता राजेश खन्ना.

Bollywood's first superstar Rajesh Khanna's memorial day | बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचा आज स्मृतिदिन

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचा आज स्मृतिदिन

Next
- प्रफुल्ल गायकवाड
 
(२९ डिसेंबर, इ.स. १९४२ - १८ जुलै, इ.स. २०१२) 
 
बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं जहाँपनाह, हम तो बस रंगमंच की कठपुतलियां हैं असं म्हणत प्रेक्षकांना सतत आनंद देणारा अभिनेता राजेश खन्ना. 
 
भारतीय चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ही पदवी पहिल्यांदा मिळवणारा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. २९ डिसेंबर १९४२ रोजी अमृतसरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण मुंबईत गिरगावातील ठाकूरद्वार येथे गेलं. शिक्षण सेंट अँड्य्रू हायस्कूल येथे झालं. रवी कपूर (जितेंद्र) हे त्यांचे शाळेतील सहकारी होते. शाळा-कॉलेजमध्ये अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आणि विविध पारितोषिकं पटकाविली. लहानपणापासूनच त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे स्ट्रग"च्या काळात स्वतःची स्पोर्टस कार घेऊन फिरणाऱ्या काही अपवादात्मक नवकलाकारांपैकी ते एक होते. 
 
१९६५ मध्ये युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांनी घेतलेल्या इंडिया टॅलेंट कॉन्टेस्टमध्ये त्यांनी भाग घेतला आणि स्पर्धा जिंकली. १९६६ मध्ये आखरी खत या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. राजेश खन्ना यांच्या करिअरला खरी कलाटणी मिळाली ती १९६९ मध्ये आलेल्या आराधना या चित्रपटामुळे. चांगली कथा आणि श्रवणीय संगीत याबरोबरच शर्मिला टागोरसारखी नायिका आणि त्याच्या जोडीला राजेश खन्नांचा अभिनय बहरला. मेरे सपनों की रानी कब आयेगी, रूप तेरा मस्ताना अशा काही गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. हिंदी चित्रपटसृष्टीला पहिला सुपरस्टार लाभला. त्यानंतर कटी पतंग, अमर प्रेम, अपना देश, आप की कसम, मेरे जीवन साथी, आन मिलो सजना, नमक हराम, आनंद, दुश्‍मन, हाथी मेरे साथी, सच्चा झुठा, सफर, बंधन, बावर्ची, अमरदीप, फिर वही रात, बंदिश, थोडीसी बेवफाई, दर्द, कुदरत, अगर तुम न होते, सौतन, जानवर, आवाज अशा १६३ चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांची व मुमताज, शर्मिला टागोर यांची जोडी खूप गाजली होती. अंजू महेंद्रूबरोबर त्यांनी काम केलं आणि तिच्याशी त्यांचं प्रेमही जुळले होते. त्या दोघांची लव्हस्टोरी त्या वेळी प्रचंड गाजली.
 
लग्न होता होता ही जोडी वेगळी झाली आणि सन १९७३ मध्ये त्यांनी डिम्पल कपाडियाबरोबर लग्न केले. डिम्पल आणि त्यांची पहिली भेट विमानात झाली होती. या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि नंतर लग्नही झालं. दिवंगत गायक किशोर कुमार यांनी राजेश खन्ना यांच्यासाठी कित्येक चित्रपटांना आवाज दिला होता. ही गायक आणि अभिनेत्याची जोडी छान जमली होती. किशोर कुमारबरोबरच आर. डी. बर्मन यांच्याशीही त्यांची जवळीक होती. या तिघांनी मिळून अनेक हिट गाणी दिली. सत्तरीच्या दशकात कित्येक तरुणी अगदी वेड्यासारख्या त्यांच्यावर फिदा असायच्या. त्यांची सफेद रंगाची गाडी कोणत्याही स्टुडिओच्या बाहेर उभी असली, की मुली त्या गाडीचेही चुंबन घ्यायच्या. त्या वेळेस त्यांची गाडी लिपस्टिकच्या खुणांनी भरलेली असायची. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्‍वगायनही केले. ऐंशीच्या दशकात टीना मुनीममुळे डिम्पल आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे राहायला लागले. चित्रपटाप्रमाणेच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही चांगली कामगिरी केली. 
 
गोड हास्य आणि हात वर करून डोके हलविण्याची लकब गाजली. राजेश खन्ना यांचे मूळ नाव जतिन. त्यांना एका कुटुंबाने दत्तक घेतले होते. चित्रपटांत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या काकाने राजेश नाव दिले. दूरचित्रवाहिन्यांवरील इत्तेफाक आणि अपने पराये या दोन मालिकांत काम. त्याशिवाय रघुकुल रीत सदा चली आयीमध्येही भाग. १९९२-९६ या काळात ते कॉंग्रेसचे खासदार होते. 
 
बहीण-भावाचे आमचे नाते - सीमा देव
राजेश खन्ना आणि माझ्यामध्ये बहीण-भावाचे नाते होते. त्यांची व माझी पहिली भेट आनंद या हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती, तरी पहिल्यांदा आम्ही एकदा फोनवर बोलल होतो . त्या वेळी त्यांनी माझे कौतुक केले होते. त्याचे असे झाले होते, की रमेश देव आणि ते एका चित्रपटात काम करीत होते. रमेशने मला फोन करून दुपारचा डबा जास्त पाठव, असे सांगितले होते. शेवयाची खीर आणि एकूणच ते जेवण घेतल्यानंतर राजेश खन्ना यांचा फोन आला होता. आप खाना बहोत अच्छा बनाती है... असा डबा रोज पाठवीत जा...असे ते मला म्हणाले होते. आनंदच्या सेटवर त्यांची व माझी भेट झाली होती. त्यांच्याबरोबर काम केले तेव्हा ते किती ताकदीचे कलाकार आहेत, हे समजले होते. आपले काम नेटके कसे होईल, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. जोपर्यंत ते टॉपला होते तोपर्यंत प्रेक्षकांनी त्यांना डोक्‍यावर घेतले होते. सगळीकडे त्यांचा उदोउदो होत होता. जसजशी त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली तसतशी फिल्म इंडस्ट्री त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती, याचीच खंत वाटल्याची प्रतिक्रिया सीमा देव यांनी राजेश खन्ना यांच्या निधनानंतर व्यक्त केली होती. 
 
पहिला सुपरस्टार गेल्याची खंत - तनुजा
राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करण्यापूर्वीच मी त्यांचा राज हा चित्रपट पाहिला होता. त्याच वेळी हा तरुण निश्‍चितच हिंदी चित्रपटसृष्टीत राज्य करील, असे मला वाटले होते. तो नक्कीच टॉपचा स्टार होईल, असे भाकीत मी त्याच वेळी वर्तविले होते. कारण, एकूणच या चित्रपटातील त्यांचे काम, त्यांची बोलण्याची स्टाईल मला स्वतःला काहीशी वेगळी आणि अनोखी वाटली होती. मला त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली "हाथी मेरे साथी"मध्ये. त्या वेळी ते सुपरस्टार झालेले होते. आराधना या चित्रपटामुळे त्यांना रातोरात सुपरस्टारपद मिळाले होते. त्याच वेळी माझे भाकीत खरे ठरल्याचा मलादेखील आनंद झाला होता. त्यांच्याकडे वेगळे पोटेन्शियल होते. एखादा सीन समजावून घेतल्यानंतर तो पडद्यावर किती उत्तम प्रकारे आपण साकारू शकतो, याचा ते सतत विचार करीत असायचे. त्यांच्या निधनानंतर पहिला सुपरस्टार गेल्याची खंत तनुजा यांनी व्यक्ती केली होती.
 
मौत तो एक पल हैं, बाबू मोशाय... 
जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं, जहॉंपनाह, जिसे ना आप बदल सकते हैं ना मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर उपरवाले के हाथ बंधी हैं। कब, कौन, कैसे उठेगा, ये कोई नहीं जानता। इसलिए बाबू मोशाय... ए बाबू मोशाय जिंदगी जो हैं वो बडी होनी चाहिए, लम्बी नहीं होनी चाहिए। इतना प्यार ज्यादा अच्छा नहीं हैं।
 
मौत तू एक कविता हैं। मुझसे इक कविता का वादा हैं, मिलेगी मुझको, डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने लगे... क्‍या फर्क हैं ७० साल और ६ महिने में। मौत तो एक पल हैं बाबू मोशाय।
 
का काकाजी?
राजेश खन्ना यांना काकाजी असे म्हटले जाते होते. हे नाव त्यांना कसे मिळाले, याविषयी स्वत: त्यांनीच एका समारंभात सांगितल्यानुसार, काकेचा पंजाबीत एक छोटा मुलगा असा अर्थ होतो. जेव्हा ते चित्रपटांत आले, त्या वेळी ते तरुण आणि छोटे होते. त्यामुळे त्यांना काका असे संबोधण्यात येऊ लागले. त्यानंतर त्यांच्याविषयी आदर म्हणून त्यापुढे जी असे चिकटले. 
 
गाजलेले दहा चित्रपट
आराधना 
खामोशी 
हाथी मेरे साथी 
सफर 
कटी पतंग 
दुश्‍मन 
आनंद 
अंदाज 
अमर प्रेम 
आप की कसम 
 
प्रसिद्ध गाणी
मेरे सपनों की रानी 
जिंदगी एक सफर है सुहाना 
जिंदगी कैसी है पहेली 
चिंगारी कोई भडके 
रूप तेरा मस्ताना 
ओ मेरे दिल के चैन 
जय जय शिवशंकर 
मैने तेरे लिये सात रंग 
चल चल मेरे हाथी 
बिंदियॉं चमकेगी 
 
राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार आणि पारितोषिके
फिल्म फेअर पुरस्कार (१९७१) - उत्कृष्ट अभिनेता
फिल्म फेअर पुरस्कार (१९७२) - उत्कृष्ट अभिनेता
फिल्म फेअर पुरस्कार (१९७५) - उत्कृष्ट अभिनेता
फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार  (२००५)
राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी तब्बल १४ वेळा नामांकित करण्यात आले होते, त्यापैकी ३दा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.
 
 

सौजन्य : ग्लोबल मराठी /मराठी विकिपीडिया

Web Title: Bollywood's first superstar Rajesh Khanna's memorial day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.