बॉम्बे हायकोर्टाचे नाव मुंबई हायकोर्ट करा -शिवसेना
By admin | Published: May 1, 2016 01:51 AM2016-05-01T01:51:52+5:302016-05-01T01:51:52+5:30
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय, असे नामांतर करण्याची मागणी केली.
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय, असे नामांतर करण्याची मागणी केली.
बॉम्बे उच्च न्यायालयाचे नामांतर करावे, ही शिवसेनेची जुनी मागणी आहे. मोदींना दिलेल्या पत्रात विनायक राऊत यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या आदेशाद्वारे १९९५ मध्ये महाराष्ट्राच्या राजधानीचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले आहे. तथापि, बॉम्बे उच्च न्यायालयासह राज्यातील काही संस्था आजही शहराचे जुनेच नाव वापरत आहेत. शिवसेना २००५ पासून न्यायालयाच्या नामांतरासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र, केंद्राने या मुद्याकडे दुर्लक्ष केले होते, असे राऊत म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)