मुसळ'धार' पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता, गटारातून गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 01:42 PM2017-08-30T13:42:47+5:302017-08-30T15:50:33+5:30

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  डॉ. अमरापूरकर गेल्या 18 तासांपासून बेपत्ता असून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Bombay Hospital doctor's doctor Deepak Amrapurkar disappeared during the monsoon | मुसळ'धार' पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता, गटारातून गेले वाहून

मुसळ'धार' पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता, गटारातून गेले वाहून

Next

मुंबई, दि. 30 - मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी उघड्या ठेवण्यात आलेल्या गटारातून अमरापूरकर वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, डॉ. अमरापूरकर गेल्या 18 तासांपासून बेपत्ता असून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांना केवळ त्यांची छत्री सापडली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. डॉ.अमरापूरकर मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारात बॉम्बे हॉस्पिटलमधून प्रभादेवी परिसरातील आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते.धक्कादायक म्हणजे, सकाळपर्यंतही ते घरी पोहोचले नसल्याची माहिती त्यांच्या जवळील नातेवाईकांकडून मिळाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रशासनाकडून परिसरातील गटार उघडी ठेवण्यात आली होती, या उघड्या गटारातूनच  डॉ. दीपक अमरापूरकर वाहून गेल्याचे बोलले जात आहे.  

पत्नीसोबत शेवटचा झाला होता संपर्क 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर अमरापूरकर दुपारच्या सुमारास रूग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी पत्नीला फोन करुन घरी पायी चालत येत असल्याची माहिती दिली. अंधरात अमरापूरकर यांना कमी दिसत असल्याने पत्नीनं त्यांना सांगितले की, तुम्ही आहात तिथेच थांबा, मी तेथे पोहोचते. ज्याठिकाणाहून अमरापूरकर वाहून गेल्याची माहिती मिळाली तेथे आसपास परिसरात त्यांची पत्नी पोहोचलीदेखील होती. मात्र प्रचंड प्रमाणात पाणी साचलेले असल्याने पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. त्यावेळी त्यांनी अमरापूरकर यांना फोन केला, मात्र त्यांनी फोनचे उत्तर दिले नाही.  दुसरीकडे प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या बहिणीला सांगितले की,  एक व्यक्ती याठिकाणाहून वाहून जात होता,  आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्नांना यश आले नाही. आमच्या हातात केवळ त्यांची छत्रीच राहिली. 

आश्चर्याची बाब म्हणून ज्या ठिकाणाहून डॉ अमरापूरकर बेपत्ता झालेत त्या ठिकाणाहून त्यांचे घर केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. घटनास्थळावर अमरापूरकर यांची केवळ छत्री सापडली व त्यांचा शोध आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

मुलुंडचे वैद्यही बेपत्ता

मुलुंडमधील रहिवासी माधव वैद्य (80 वर्ष) हेदेखील मंगळवारपासून बेपत्ता झाले आहेत. मुसळधार पाऊस येत असल्याने घराकडे निघालेले वैद्य घरी परतलेच नसल्याचं सूत्रांनी सांगितले. मुलुंडहून बोरीवलीला जात असताना ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.   


 

Web Title: Bombay Hospital doctor's doctor Deepak Amrapurkar disappeared during the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.