बँकांमध्ये बॉम्बच्या अफवेने वाडेगावमध्ये खळबळ
By admin | Published: January 19, 2017 02:44 AM2017-01-19T02:44:02+5:302017-01-19T02:44:02+5:30
अकोल्याहून बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आले.
वाडेगाव (जि. अकोला), दि. १८- स्थानिक धनोकार व्यापारी संकुलामध्ये असलेल्या दत्तात्रय को-ऑपरेटिव्ह बँक बुलडाणा, अर्बन बँक व सेंट्रल बँक या तीन बँकांमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी कॉल एका शाखाधिकार्यांना आल्याने येथे बुधवारी दुपारी एकच खळबळ उडाली.
स्थानिक दतात्रय को-ऑपरेटिव्हचे शाखाधिकारी विठ्ठल पाचपोर यांना मोबाईलवर दुपारी १२ वाजता कॉल आला. संकुलातील बँकामध्ये बॉम्ब असून ताबडतोब बँका खाली करा, असे त्यांना फोन करणार्या अज्ञाताने सांगितले. लागोपाठ तीन वेळा असे कॉल आल्यानंतर त्यांनी पोलिसांनी कल्पना दिली. पोलिसांनी बँकेत येऊन तपासणी केली असता, त्यांना काहीच आढळले नाही. अकोल्याहून बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासणी केल्यानंतर ही अपवाच असल्याचे स्पष्ट झाले.