कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट

By admin | Published: August 24, 2014 01:09 AM2014-08-24T01:09:29+5:302014-08-24T01:09:29+5:30

शहरातील शाहू जकात नाक्याजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खाद्यपदार्थ विक्री करणा:या हातगाडीत गावठी बॉम्बचा स्फोट झाला.

Bombs exploded in Kolhapur | कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट

कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट

Next
कोल्हापूर : शहरातील शाहू जकात नाक्याजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खाद्यपदार्थ विक्री करणा:या हातगाडीत गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात गाडीचालक श्रीधर मारुती कोठावळे (22) व मनोज विनायक परब (23) हे जखमी झाले आहेत़ 
बॉम्बमध्ये एक विशिष्ट प्रकारचे सर्किट, बॉल-बेअरिंग, छर्रे आदी साहित्याचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आह़े त्यातील र्छे श्रीधर कोठावळे याच्या तोंडास व हाताला लागले आहेत. गणोशोत्सव आठवडय़ावर आला असताना हा स्फोट झाल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. याप्रकरणी राज्य शासनही सतर्क झाले. हा स्फोट नेमका कोणत्या कारणांवरून झाला असावा यासंबंधीची माहिती अजून स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम उशिरार्पयत सुरू होते. 
बॅाम्बशोध पथकाने घटनास्थळी येऊन चौकशी केली. बॉम्ब नेमका किती तीव्रतेचा आहे, हे त्याच्या अहवालावरूनच समजू शकेल. रविवार्पयत हे अहवाल येणार असून, त्यानंतरच सत्य काय ते कळेल़ याप्रकरणी कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. (प्रतिनिधी)
 
च्पोलीस घटनास्थळी तातडीने आले, परंतु त्यांच्यासोबत बॉम्बशोध पथक नव्हते. प्लास्टिकच्या पिशव्या हातात घालून पोलिसांनीच र्छे व अन्य साहित्य गोळा केले. रात्री उशिरा घटनास्थळी बॉम्बशोध पथक गेल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title: Bombs exploded in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.