बोनस जाहीर झाल्याने बेस्टचा संप टळला, बोनस की उचल? : सुधारणा दाखविण्याची अट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 09:01 PM2017-10-18T21:01:50+5:302017-10-18T21:02:30+5:30

बेस्ट प्रशासनाने साडेपाच हजार रुपये बोनस जाहीर केल्याने ऐन भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप आता टळला आहे.

 The bonuses are announced due to bonus, bonus key lifting? : Condition to show improvement | बोनस जाहीर झाल्याने बेस्टचा संप टळला, बोनस की उचल? : सुधारणा दाखविण्याची अट

बोनस जाहीर झाल्याने बेस्टचा संप टळला, बोनस की उचल? : सुधारणा दाखविण्याची अट

Next

मुंबई : बेस्ट प्रशासनाने साडेपाच हजार रुपये बोनस जाहीर केल्याने ऐन भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप आता टळला आहे. मात्र आर्थिक सुधारणा करण्याच्या अटीवर ही रक्कम दिली जाणार असल्याने बोनस म्हणून दिलेले पैसे आगाऊ रक्कम म्हणूनही वसूल केले जाणार आहेत.

मुंबई महापालिका कर्मचा-यांना १४ हजार पाचशे रुपये बोनस जाहीर झाला. मात्र बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कामगारांची मागणी बेस्ट आणि पालिका प्रशासनानेही फेटाळली. त्यामुळे बेस्ट कामगारांनी २१ आॅक्टोबरला बंद पुकारण्याची तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत बोनस जाहीर करण्यात आला आहे. बेस्टच्या ४४ हजार कामगारांना हा बोनस मिळणार आहे. यासाठी महापालिका बेस्टला २५ कोटी रुपये देणार आहे. मात्र पालिका ही रक्कम बोनसऐवजी आगाऊ स्वरूपात कर्ज म्हणून, सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देणार आहे.

बेस्ट प्रशासन ही रक्कम कर्मचा-यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल. या सुधारणांची प्रक्रिया सुरू झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरू न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

बोनस की उचल?
महापालिका बोनसऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरूपात कर्ज म्हणून सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देणार आहे. बेस्ट ही रक्कम कर्मचा-यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल. सदर सुधारणांची प्रक्रिया सुरू झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरू न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
...................................
प्रयत्नांची गरज
बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत पालिकेच्या महासभेत मंजुरी दिली जाईल, असे महापौरांनी बोनस जाहीर करताना सांगितले.
...................................
पालिकेचे बेस्टला २५ कोटी रुपये
बेस्ट कर्मचा-यांच्या कृती समितीने १८ आॅक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. तसेच २१ आॅक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी संप करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता बोनस जाहीर केल्याने भाऊबीजेच्या दिवशी होणारा संप टळला आहे. बेस्टच्या ४४ हजार कामगारांना हा बोनस मिळणार आहे. यासाठी पालिकेने बेस्टला २५ कोटी रुपये दिले आहेत.

 

Web Title:  The bonuses are announced due to bonus, bonus key lifting? : Condition to show improvement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट