भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा, खोटे ठरल्यास सभागृहात आत्महत्या करेन; सुनील तटकरेंचा विधान परिषदेत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:34 AM2018-07-14T06:34:23+5:302018-07-14T06:34:55+5:30

सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गदारोळ झाला. विरोधकांनी ‘ती’ पाने नंतर जोडल्याचा आरोप सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी करताच, मी खोटा असेन, तर सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन

In the book of Geography, in the language of Gujarati | भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा, खोटे ठरल्यास सभागृहात आत्महत्या करेन; सुनील तटकरेंचा विधान परिषदेत इशारा

भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा, खोटे ठरल्यास सभागृहात आत्महत्या करेन; सुनील तटकरेंचा विधान परिषदेत इशारा

Next

नागपूर - सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गदारोळ झाला. विरोधकांनी ‘ती’ पाने नंतर जोडल्याचा आरोप सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी करताच, मी खोटा असेन, तर सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन, असे संतप्त उद्गार राष्टÑवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काढले.
तटकरे यांनी भूगोलाच्या पुस्तकात काही पाने गुजरातीत असल्याचा दावा केला. ते पुस्तकही दाखविले. मराठीला अभिजात दर्जा देण्याची भाषा करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात मराठी पाठ्यपुस्तकात गुजराती मजकूर कसा? महाराष्ट्राने अभिमान गुजरातकडे गहाण ठेवला का, असा सवाल भाई जगताप यांनी केला. धनंजय मुंडे यांनी राज्यातील पुस्तके गुजरातमधील कंत्राटदार कसा काय छापतो, असा प्रश्न केला.

सभागृह दोनदा तहकूब

सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सरकारची बाजू मांडताना विरोधकांवरच प्रत्यारोप केला. जर पुस्तकांमध्ये खरोखरच अशी चूक असती, तर आतापर्यंत आरडाओरड झाली असती. तटकरे यांनी सादर केलेल्या संबंधित पुस्तकाच्या प्रतीमध्ये पाने जोडली गेली आहेत, असा आरोप पाटील यांनी करताच सभागृहात एकच गोंधळ झाला. या गोंधळात सभागृह दोनदा तहकूब करण्यात आले. त्यानंतर, परत कामकाज सुरू झाल्यानंतर तटकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

आम्ही भूगोलाच्या पुस्तकात गुजराती छापून आणले, हा चंद्रकांत पाटील यांचा आरोप दुर्दैवी आहे. मी तसे केल्याचे वा माझा आरोप खोटा असल्याचे सिद्ध केल्यास मी सभागृहातच विष घेऊन आत्महत्या करेन, असा इशारा तटकरे यांनी दिला. यानंतर, गोंधळ वाढल्याने सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

खुलासा करण्याचे आदेश
या विषयावर सोमवारपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला दिले. ही बाब केवळ मराठी अस्मितेशी संबंधित नाही, तर विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तके गेली असून, त्यांना गुजराती समजण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी, असे ते म्हणाले.
शिवसेनेची सावध भूमिका
मराठीबाबत कायम आग्रही असणाºया शिवसेनेच्या सदस्यांनी या प्रकरणात
सावध भूमिका घेतली. या मुद्द्यावर सर्व सदस्यांनी मौन बाळगले. त्यानंतर, डॉ.नीलम गोºहे यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे वक्तव्य केले. न्यायालयीन स्टाफच्या परीक्षेत उमेदवारांना गुजराती येते का, असे विचारण्यात आल्याच्या मुद्द्याकडेदेखील त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
 

Web Title: In the book of Geography, in the language of Gujarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.