‘रयतेच्या राजा’ला पुस्तकात समाधानकारक स्थान नाही

By Admin | Published: March 17, 2015 10:19 PM2015-03-17T22:19:25+5:302015-03-17T22:19:25+5:30

नितीन बानगुुडे : दंडबळावरच चालते राजकारण, चांगुलपणाला तेथे स्थान नाही

The book of 'Royte' does not have a satisfactory place in the book | ‘रयतेच्या राजा’ला पुस्तकात समाधानकारक स्थान नाही

‘रयतेच्या राजा’ला पुस्तकात समाधानकारक स्थान नाही

googlenewsNext

राजापूर : राजकारण हे दंड बळावर किंवा चांगुलपणावर चालत नाही तर बुद्धी कौशल्यावरच चालते. हे वेळीच ओळखून वागणारे छत्रपती शिवाजी राजे जगात आदर्श ठरले. त्यांच्या यशाची गाथा यापुढेही अशीच दुमदुमत राहील, मात्र एवढे असामान्य कर्तृत्त्व दाखवणाऱ्या रयतेच्या राजासाठी आमच्या पाठ्यपुस्तकात समाधानकारक स्थान नसते. ही खेदजनक बाब असल्याची खंत ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्रा. नितीन बानगुडे (पाटील) यांनी रायपाटण होळीचा मांड येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.
शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व रायपाटण गावाचे सुपुत्र केतन रोडे यांच्या सहकार्याने प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानाचा कार्यक़्रम रायपाटण होळीचा मांड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. बानगुडे पाटील बोलत होते. सदरप्रसंगी व्यासपीठावर श्री वडचाई देवस्थाचे सर्व मानकरी, गावकार, ट्रस्टचे पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, राजापूर पंचायत समितीचे उपसभापती उमेश पराडकर रायपाटण रेवणसिद्ध मठाचे स्वामी उपस्थित होते.
निर्माण केलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने जनतेसाठीच आहे. याच जाणिवेतून आदर्श राज्यकारभार करीत लोकाभिमुख ठरलेल्या आदर्श राजाने आदर्श कारभार केला. लोकाभिमुख ठरलेल्या छत्रपती राजा शिवाजी राजांच्या लखलखता व तेजस्वी तळपळणारा इतिहास यावर प्रा. बानगुडे पाटील यांनी दृष्टीक्षेप टाकला.
मोगलाईच्या काळात निर्माण झालेली अंधश्रद्धा राजमाता जिजाबार्इंनी कशा पद्धतीने मोडून काढली. इथपासून जनतेच्या भातशेतीचे नुकसान करणाऱ्या रानटी जनावरांचा कशाप्रकारे बंदोबस्त केला गेला यावर विवेचन करत त्यांनी जिजाबार्इंचा आदर्श इतिहास उलगडला. जनतेसाठी स्थापन करण्यात आलेले स्वराज्य ही खरेतर त्या काळातील पहिली सहकारी संस्था होती, असे मत त्यांनी मांडले.
स्वराज्याच्या स्थापनेपासून त्यावर चाल करून येणारा अफझलखान असो, शाहिस्तेखान असो, सिद्धी जोहरपासून थेट औरंगजेबापर्यऐत राजांनी कसा लढा दिला त्यावर प्रा. बानगुडे पाटभल यांनी विस्तृत विवेचन करत साक्षात इतिहासच उभा केला. अशा न्यायी राजाने केवळ दुर्गच बांधले नाही तर नरदुर्ग देखील उभे केले हे इतिहासात अनेक लढवय्यांच्या पराक्रमावरुन दिसून आले.
अफझलखानाचा वध केल्यानंतर राजे स्वस्थ बसले नाहीत, तर पुढील २० दिवसात २०० किमीचा मुलुख पादक्रांत करत त्यांनी १८ किल्ले जिंकले होते. त्यावरुन त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती येते, असे पाटील पुढे बोलताना म्हणाले. जबाबदारी कशी पार पाडायची याचा आदर्श नमुना राजांकडे होता. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लढणाऱ्या मर्द मावळ्यांनी देखील तेच सूत्र अवलंबले. त्यामुळे स्वराज्यावरील वारंवार चालून आलेली संकटे, दूर करता आली.
केवळ कारणे सांगून चालत नाहीत कारण त्यामुळे यशोगाय माळ गळ्यात घालीत नाहीत. त्यासाठभ राजाचे हृदय असावे लागते, असे सांगून, ‘जगावे वाघासारखे व लढावे शिवबासारखे’ या उक्तीचा त्यांनी पुनरुच्चार केला. मागील अनेक वर्षे व्हिएतनाम समवेत युद्ध करणाऱ्या अमेरिकेला यश का मिळाले नाही, तर समस्त व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श मानला जात आहे म्हणूनच. या कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. (प्रतिनिधी)


स्वराज्य म्हणून जगाला ओळख करून देणाऱ्या राजा छत्रपतींच्या इतिहासाच्या कर्तृत्त्वाचे पोवाडे ज्या प्रमाणात आमच्या शालेय पाठ्यपुस्तकात किंवा एमपीएससी व युपीएससीच्या परीक्षेत असायला हवे तेवढे ते लिहिले गेले नाहीत. केवळ चार पाच ओळीतच त्यांचा इतिहास लिहून नतद्रष्टपणा दाखवला गेला अशी खंत प्रा. बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.


राजापुरात बानगुडे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान.
स्वराज्य हे खऱ्या अर्थाने जनतेसाठीच : बानगुडे.
स्वराज्य ही जनतेसाठी स्थापन केलेली पहिली सहकारी संस्था.
बानगुडे यांनी प्रेक्षकांसमोर उभा केला इतिहास.
व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मानला जातो आदर्श.

Web Title: The book of 'Royte' does not have a satisfactory place in the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.