‘राज्यातील २९ प्रकल्पांत पुस्तकगाडी’

By Admin | Published: February 24, 2015 04:22 AM2015-02-24T04:22:31+5:302015-02-24T04:22:31+5:30

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांत उत्तम शिक्षण देण्यासाठी पुस्तकगाडी हे चांगले माध्यम बनेल. आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यात मदत होईल

'Book track in 29 projects in the state' | ‘राज्यातील २९ प्रकल्पांत पुस्तकगाडी’

‘राज्यातील २९ प्रकल्पांत पुस्तकगाडी’

googlenewsNext

वाडा : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांत उत्तम शिक्षण देण्यासाठी पुस्तकगाडी हे चांगले माध्यम बनेल. आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यात मदत होईल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केला. वाड्यातील सोनळेत पुस्तकगाडी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास विभाग व क्वेस्ट संस्था २९ प्रकल्पांमध्ये ही योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वयोगटांनुसार वाचन क्षमता विकसित करण्यासाठी विविध कृती कार्यक्रम केले जाणार आहेत. सौरऊर्जेद्वारे विद्यार्थ्यांना बालचित्रपट दाखविले जातील. विद्यार्थ्यांना व साहित्यिकदृष्ट्या समृद्ध करण्यात हा प्रकल्प यशस्वी होईल, असे संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. हा उद्घाटनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणात पार पडला. या वेळी आमदार पांडुरंग बरोरा, प्रकल्प अधिकारी ए़ एस़ गंगर उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: 'Book track in 29 projects in the state'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.