राज्यात पायाभूत प्रकल्पांचे बूस्टर !

By admin | Published: December 1, 2015 04:29 AM2015-12-01T04:29:23+5:302015-12-01T04:29:23+5:30

राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या आठ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या

Booster for infrastructure projects in the state! | राज्यात पायाभूत प्रकल्पांचे बूस्टर !

राज्यात पायाभूत प्रकल्पांचे बूस्टर !

Next

मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ समितीचा निर्णय : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढणार

मुंबई - राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या आठ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने सोमवारी तत्त्वत: मंजुरी दिली. हे प्रकल्प २०१९पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वेच्या आखणीस मंजुरी देऊन, या प्रकल्पाच्या पूर्व सुसाध्य अहवालासही (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) या वेळी मान्यता देण्यात आली. हा एक्स्प्रेस-वे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार आहे. या मार्गासाठी सहा महिन्यांत पर्यावरण व वन विभागाच्या परवानग्या घेण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील उन्नत मार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीच्या कामाव्यतिरिक्त, राज्यासाठी महत्त्वपूर्ण अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून, या वेळी मान्यताही देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते विकासाला गती मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश
महेता, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

अनेक प्रकल्प एमएसआरडीसीकडे
आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या एमएसआरडीसीचे पंख छाटण्यात आले होते. विशिष्ट कंत्राटदारांचे चांगभलं होत असल्याची बाब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खटकत होती, तसेच हे खाते राष्ट्रवादीकडे असल्याने, एमएसआरडीसीला बळ देण्यास ते फारसे इच्छुक नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वेसह अनेक प्रकल्प एमएसआरडीसीकडे देत, त्याला बळ देण्याची भूमिका घेतली. हे खाते शिवसेनेकडे आहे.

असे आहेत प्रकल्प...
नागपूर - मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे
40,000 कोटी रुपये

ठाणे - घोडबंदर
रस्त्यावर उन्नत मार्ग
800 कोटी रुपये

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे
3400 कोटी रुपये

वाकण- पाली-खोपोली रस्त्याचे चौपदरीकरण

500 कोटी रुपये
या प्रकल्पांना तत्त्वत: मंजुरी देण्यात आली.

सायन - पनवेल रस्त्यावर ठाणे खाडीवर तिसऱ्या पुलाचे बांधकाम

800 कोटी रु पये

ठाणे येथील टिकुजीनीवाडी ते बोरीवलीदरम्यान भुयारी मार्ग तयार करणे

3000 कोटी रु पये

भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील उन्नत मार्ग

2600 कोटी रु पये

विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुलांची कामे

800 कोटी रु पये

Web Title: Booster for infrastructure projects in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.