आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बूट अन् मौजे

By admin | Published: January 8, 2015 01:43 AM2015-01-08T01:43:10+5:302015-01-08T01:43:10+5:30

आदिवासींच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उत्थानासाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी बूट, पायमोजे खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Boots and shoes for tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बूट अन् मौजे

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बूट अन् मौजे

Next

गणेश वासनिक - अमरावती
आदिवासींच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उत्थानासाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी बूट, पायमोजे खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन महिन्यांत ही खरेदी होणार असून येत्या शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना या वस्तू वितरित केल्या जातील.
आदिवासी विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी शैक्षणिक साहित्य नि:शुल्क पुरविण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना बूट, पायमोजे देता यावे, यासाठी खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ई-टेंडरिंगने निविदा मागविण्यात आल्या आहेत.
सध्या निविदा उघडण्यात आल्या नसल्या तरी बूट, पायमोजे खरेदीसाठी आदिवासी विकास आयुक्त कार्यालयातून वेगाने चक्रे फिरविली जात आहे. सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या बुट, पायमोजे खरेदीसाठी सुमारे ६.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा
च्आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच भोजन, निवास, अंथरुण, पांघरुण, गणवेष, वह्या, पुस्तके, शालेय साहित्य तसेच खोबरेल तेल, आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, दंतमंजन, जेवणासाठी ताट- वाटी, बूट, मोजे, लोखंडी पेटी, खेळ साहित्य, वूलन स्वेटर्स, कुडता, पायजामा व नाईट गाऊन आदी साहित्य मोफत पुरविण्यात येते.

च्राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व ठाणे तसेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुख्यत: आदिवासींची संंख्या अधिक आहे. आदिवासी विकास विभागाचा कारभार नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर या चार अपर आयुक्त कार्यालयातून चालविला जातो. सुमारे दोन हजार कोटींचे बजेट असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ५५२ आश्रमशाळा सुरु आहेत. या आश्रमशाळांमध्ये अडीच लाखांच्या घरात विद्यार्थी आहेत.

Web Title: Boots and shoes for tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.