सीमावाद : कर्नाटकसोबत तोडग्यासाठी आज दिल्लीत खलबते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:02 AM2022-12-14T06:02:48+5:302022-12-14T06:03:03+5:30

अमित शहांपुढे शिंदे-फडणवीस मांडणार बाजू

Border Dispute of Belgaon For a solution today in Delhi | सीमावाद : कर्नाटकसोबत तोडग्यासाठी आज दिल्लीत खलबते

सीमावाद : कर्नाटकसोबत तोडग्यासाठी आज दिल्लीत खलबते

googlenewsNext

मुंबई/म्हैसूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर राज्याची भूमिका स्पष्ट करू, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. 

बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत ही बैठक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बोम्मई म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सीमावादावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे, त्यावेळी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मी राज्य पुनर्रचना कायद्यापासून घडलेल्या सर्व घडामोडींचा तपशील सांगेन. राज्यघटनेतील तरतुदी, राज्य पुनर्रचना कायदा आणि सर्वोच्च न्यायालयासमोरील वादाबाबतची याचिकाही आपण सविस्तरपणे मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.’

गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या वाहनांना लक्ष्य केल्यावर सीमावाद वाढला. दोन्ही राज्यांतील नेत्यांच्या भाषणबाजीदरम्यान बेळगावमध्ये कन्नड आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यात दोन्ही बाजूंनी शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे यावर एकमत झाले.

१९५७ पासून प्रलंबित वाद 
n भाषक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेनंतर १९५७ पासून सीमावादाचा प्रश्न कायम आहे. 
n पूर्वीच्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’चा भाग असलेल्या बेळगावींवर महाराष्ट्राचा दावा आहे, कारण तेथे मोठ्या प्रमाणात मराठी भाषक लोकसंख्या आहे. 
n सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या ८१४ मराठी भाषक गावांवरही महाराष्ट्र हक्क सांगतो.

Web Title: Border Dispute of Belgaon For a solution today in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.