बोर्डीत पर्यटकांची कार खोल समुद्रात अडकली

By admin | Published: March 21, 2017 03:32 AM2017-03-21T03:32:24+5:302017-03-21T03:32:24+5:30

दहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली.

Bordered tourist car stuck in the sea | बोर्डीत पर्यटकांची कार खोल समुद्रात अडकली

बोर्डीत पर्यटकांची कार खोल समुद्रात अडकली

Next

अनिरुद्ध पाटील / बोर्डी
दहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली. ती वाळूत अडकून भरतीच्या पाण्याखाली गेली. पर्यटक प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. परंतु, भरतीमुळे गाडी दिवसभर पाण्यात बुडालेल्या स्थितीत होती. दुसऱ्या दिवशी ओहोटी लागल्यावर पोलीस व स्थानिकांच्या मदतीने कार जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली.
अरविंद खर्डेश्वर यांच्यासोबत एक पुरु ष, दोन महिला आणि लहान मुलगा अशा पाच व्यक्ती रविवारी कारने बोर्डीला आल्या होत्या. दुपारी नॅशनल शाळेसमोरील समुद्रकिनारा, चौपाटी त्यांनी पाहिली. त्यानंतर त्यांनी कार थेट समुद्राच्या पाण्यात घातली. ती वेळ नेमकी भरतीची होती. मात्र त्यांना ते माहीत नव्हते. भरतीच्या वेळी रेती किनाऱ्यावर लोटली जाते. खाली अत्यंत चिकणमातीच्या चिखलाचा थर जमतो. त्यात ही कार फसली आणि बंद पडली. झपाट्याने वाढणारे भरतीचे पाणी कारमध्ये शिरू लागल्याचे पाहताच आतील सर्व बाहेर आले. किनाऱ्यावरील मंडळींचे सहकार्य मिळेपर्यंत कार मात्र भरतीच्या पाण्यात बुडाली होती.
पोलिसांनी झाई आणि बोर्डी येथील स्थानिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखलात ती खोलवर रुतल्याने आणि भरती आल्याने सायंकाळी ५च्या सुमारास हे प्रयत्न थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी ८ वाजता कार बाहेर काढली.
परगावातील पर्यटक किनाऱ्यावर अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून पाण्यात पोहणे यामुळे विनाकारण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. शिवाय असुरक्षित वातावरण निर्माण करतात. अशा वाहनांवर व पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली असून, पर्यटन विकेंड उत्सव काळ आणि पर्यटन हंगाम या काळात जीवरक्षकाची नेमणूक करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर डहाणूतील घोलवड आणि बोर्डी या किनारी टेहळणी टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, तेथे जीवरक्षक नाहीत. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सरुक्षिततेविषयी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी त्याचे पालन मात्र होत नाही.

Web Title: Bordered tourist car stuck in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.