बोर घाट लवकरच प्रवाशांसाठी होणार खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:04 AM2019-12-19T07:04:11+5:302019-12-19T07:04:19+5:30

काम ७५ टक्के पूर्ण; १५ जानेवारीला मुंबई-तिसरी मार्गिका सुरू करण्याचे नियोजन

Bore ghat will soon be open to travelers | बोर घाट लवकरच प्रवाशांसाठी होणार खुला

बोर घाट लवकरच प्रवाशांसाठी होणार खुला

googlenewsNext

मुंबई : मुंबई ते पुणे तिसऱ्या मार्गिकेचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल. बोर घाटातील काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित काम आणि चाचणी घेऊन ही मार्गिका लवकरात लवकर म्हणजे १५ जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सप्टेंबर-आॅक्टोबर २०१९ दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनच्या मधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वे मार्ग वाहून गेला. रेल्वे रुळांखालील खडी, रेती वाहून गेली. त्यामुळे ३ आॅक्टोबरपासून तिसरी मार्गिका पूर्णपणे बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये हा मार्ग बंद असल्याने रेल्वेच्या इतिहासातील पहिल्यांदाच इतका मोठा ब्लॉक ठरला आहे.
दोन टनेलच्या मध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला रेल्वे मार्ग उभा करणे आव्हानात्मक आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मार्गावर इतका मोठा ब्लॉक घेऊन कामे केली जात आहेत.
मंकी हिल ते नागनाथ येथील वाहून गेलेल्या मार्गात खांब उभारण्यात आले आहेत. यावर रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत. कमी जागेत खोदकाम करून सुरक्षितरीत्या काम केले जात आहे. रेल्वे कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे ही मार्गिका लवकर खुली होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. आता या ठिकाणाहून इंजीन चालवून चाचणी घेण्यात येणार आहे.

कामाच्या ठिकाणी गर्डर दाखल
बोर घाटातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गिकेसाठी लागणारे गर्डर कामाच्या ठिकाणी आणण्यात आले आहेत. लवकरच हे गर्डर टाकण्यात येणार आहेत. मुंबई ते पुणे तिसºया मार्गिकेचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Bore ghat will soon be open to travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.