महाडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: February 6, 2015 01:59 AM2015-02-06T01:59:01+5:302015-02-06T01:59:01+5:30

कर्जाची परतफेड करू न शकलेल्या महाड तालुक्यातील गावडी येथील शेतकऱ्याने विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली .

Borrower farmer suicides in Mahad | महाडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

महाडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next

महाड : कर्जाची परतफेड करू न शकलेल्या महाड तालुक्यातील गावडी येथील शेतकऱ्याने विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली . ही घटना बुधवारी घडली. काशीराम मालुसरे (६२) असे त्याचे नाव आहे. त्यांनी शेतीसाठी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले होते. शिवाय काहीजणांकडून उसने पैसे घेतले होते. मात्र यावर्षी फारसे पीक न आल्यामुळे ते हैराण झाले होते. मागील आठवड्यात सर्वजण झोपलेले असताना त्यांनी कीटकनाशक प्यायले. त्यांना मुुंबईतील जे. जे. रुग्णायात हलवण्यात आले. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)

Web Title: Borrower farmer suicides in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.