बॉश-आयटीआयमध्ये झाला सामंजस्य करार

By admin | Published: July 25, 2015 01:33 AM2015-07-25T01:33:31+5:302015-07-25T01:33:31+5:30

बॉश कंपनी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्यात रिस्पॉन्स टू इंडिया डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रोथ थ्रु एम्प्लॉयब्लिटी

Bosh-ITI's Memorandent of Understanding | बॉश-आयटीआयमध्ये झाला सामंजस्य करार

बॉश-आयटीआयमध्ये झाला सामंजस्य करार

Next

मुंबई : बॉश कंपनी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्यात रिस्पॉन्स टू इंडिया डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रोथ थ्रु एम्प्लॉयब्लिटी एन्हान्समेंट (ब्रीज) हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे व बॉश कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन पाटील यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
तावडे म्हणाले की, आयटीआयमधील प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षण अर्धवट सोडलेल्या परंतु रोजगाराच्या शोधात असलेल्या १८ ते २५ वर्षे वयोगटातील उमेदवारांकरिता औद्योगिक आस्थापनांमधील रोजगाराकरिता आवश्यक असलेले कौशल्य विकसित करण्याकरिता ब्रीज कोर्स राबवण्यात येणार आहे. आयटीआय व उर्वरित २४ संस्थांमध्ये बॉश आस्थापनांच्या वतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल. वर्षभरात ३७०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. कर्नाटकात या माध्यमातून ९९ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे.

Web Title: Bosh-ITI's Memorandent of Understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.