सेक्स रॅकेटच्या मुख्य सूत्रधारासह दोघे अटकेत
By admin | Published: March 8, 2015 02:15 AM2015-03-08T02:15:47+5:302015-03-08T02:15:47+5:30
शहरातील अल्पवयीन मुलीस शरीर विक्रयास भाग पाडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधारासह दोघांना शनिवारी सकाळी हिंगोली शहर पोलिसांनी अटक केली.
हिंगोली : शहरातील अल्पवयीन मुलीस शरीर विक्रयास भाग पाडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधारासह दोघांना शनिवारी सकाळी हिंगोली शहर पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आठ आरोपींना यापूर्वीच अटक झालेली असून, आता बबलू शर्मा व चेतन बांगर यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
१५ जानेवारी रोजी पोलिसांचे ‘निर्भया पथक’ गस्तीवर असताना दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी शहरातील बसस्थानकाजवळ एकटीच उभा असल्याचे दिसून आले.
फौजदार कोमल शिंदे
यांनी तिची विचारपूस करून
तिला पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपणास काही जणांनी वाममार्गाला लावल्याचे सांगितले होते.
तसेच काही नवीन जण पुन्हा तिला घेऊन जाणार असल्याचे समजल्यावर सापळा रचून पोलिसांनी प्रारंभी दोघांना ताब्यात घेतले होते.
दरम्यान, पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून एक महिला व
१० आरोपींविरुद्ध अॅट्रासिटीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा व इतर
कलमांनुसार हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात आतापर्यंत एका महिलेसह आठ जणांना अटक
झाली आहे. आता बबलू शर्मा व चेतन बांगर यांना अटक झाली असून, न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)