विधान परिषदेच्या निवडणुका दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार
By admin | Published: November 17, 2015 02:16 AM2015-11-17T02:16:06+5:302015-11-17T02:16:06+5:30
विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होेऊ घातलेल्या निवडणुका काँग्रेससोबत लढण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत एकमत झाले.
मुंबई : विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होेऊ घातलेल्या निवडणुका काँग्रेससोबत लढण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत एकमत झाले.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी काँग्रेससोबत जाण्याच्या विचारावर विस्तृत चर्चा झालेल्या या बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यसभेचे खासदार डी.पी. त्रिपाठी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळाचे गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, खा. वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत काही उपाययोजना राबविण्याची माहिती शरद पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. सरकारने त्या उपाययोजना केल्या का? त्या उपाययोजनांचा फायदा खालपर्यंत पोहोचलाय का? याचा आढावाही स्थानिक स्वराज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी बैठक संपल्यानंतर दिली.