दोघेही युतीचे मारेकरी

By admin | Published: January 28, 2017 01:09 AM2017-01-28T01:09:56+5:302017-01-28T01:09:56+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी

Both of the fighters of the alliance | दोघेही युतीचे मारेकरी

दोघेही युतीचे मारेकरी

Next

यदु जोशी / मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी असल्याचे संपूर्ण घटनाक्रमावरून स्पष्ट होते.
दोन्ही पक्षांचे नेते चर्चेला बसलेले असतानाच २२७ उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम वेगात सुरू होते. शिवसेनेने युतीची वाट न बघता वचननामादेखील जाहीर केला. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या दोन पक्षांपैकी मुंबईवर राज्य कोणाचे ही वर्चस्वाची घमासान लढाई आता बघायला मिळणार आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान हे आजवरचे समीकरण. राज्यात भाजपा नंबर एकचा पक्ष झाला तरी मुंबईतील शिवसेनेचे मोठेपण कायमच होते. युतीच्या बोलणीची सुरुवात करतानाच, भाजपाने हे मोठेपण नाकारत समसमान म्हणजे २२७ पैकी ११४ जागा मागितल्या. ‘आपण तर मुंबईचे राजे!’ ही भावना असलेल्या शिवसेनेला त्यांच्या अंगणात आपल्या बरोबरीने कोणी येऊ पाहातेय, हे मान्य होणेच शक्य नव्हते. दोनच दिवसांत सेनेने ठणकावून सांगितले, ‘६० जागा घ्या नाहीतर घरी जा.’ भाजपाला आॅफर देण्यापेक्षा अपमानित करण्याचच केवळ हेतू असावा, असे या आकड्यावरून जाणवले.
शिवसेना साठची फार तर ७५ ते ८० जागा देईल, हे लक्षात घेऊन भाजपानेही ११४ चा हेका सोडला नाही. युती होण्यातील तो सगळ््यात मोठा अडसर शेवटपर्यंत कायम राहिला. भाजपानेही नवीन प्रस्ताव शेवटपर्यंत दिला नाही किंवा युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याने, ते शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून युतीची गाडी रुळावर आणतील, असे वाटत होते, पण तसे घडले नाही.
स्वबळावर लढण्याचा पक्षांतर्गत दबाव मुख्यमंत्र्यांवर सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेकडून ७५-८० जागा घेऊन लढण्यापेक्षा २२७ जागा लढून मोठे यश मिळवावे, हा विचार मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात पक्का केला आणि वर्षा व मातोश्रीदरम्यान एरवी अनेक विषयांवर चर्चेसाठी असलेली हॉटलाइनच बंद पडली.

Web Title: Both of the fighters of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.