बाळगंगाप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: August 27, 2015 02:27 AM2015-08-27T02:27:26+5:302015-08-27T02:27:26+5:30
पेणमधील बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर निलंबित तत्कालीन उपअभियंता राजेश रेठी आणि कंत्राटदार निसार खत्री यांना रात्री उशिरा अटक करण्यात अली.
ठाणे : पेणमधील बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर निलंबित तत्कालीन उपअभियंता राजेश रेठी आणि कंत्राटदार निसार खत्री यांना रात्री उशिरा अटक करण्यात अली. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खत्री हा अजित पवार यांचा निकटवर्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी ठाणे लाचलुचपत विभागाने शासकीय अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर गुन्हे नोंदवल्यावर त्यांच्या घरे आणि क ार्यालयांची झडती घेण्यास सुरुवात झाली. त्या वेळी सहा सरकारी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांच्याकडे कोट्यवधींचे घबाड असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर, रेठी आणि खत्री यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याचदरम्यान, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. कोंडाणा धरणास तत्त्वत: मान्यता असतानाच धरणाचे काम सुरू केल्याप्रकरणी रेठीला निलंबित केले आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्षांपासून ते निलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाचवीपर्यंत शिक्षण झालेला निसार हा अजित पवार यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. तसेच या जवळीकीमुळे १२ प्रकल्पांची कामे त्याला मिळाल्याची आणि या कुटुंबातील एकाचेही शिक्षण १० वी.पर्यंत झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
दीड वर्ष निलंबित : कोंडाणा धरणास तत्त्वत: मान्यता असतानाच धरणाचे काम सुरू केल्याप्रकरणी रेठीला निलंबित केले आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्षांपासून तो कर्तव्यावर नाही.