दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला

By admin | Published: August 9, 2015 02:21 AM2015-08-09T02:21:00+5:302015-08-09T02:21:00+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीवरून पक्षात असलेले मतभेद पुण्यात झालेल्या बैठकीत शनिवारी चव्हाटयावर आले. डावखरे यांच्या नियुक्तीला विरोध

Both of them tried to commit suicide | दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला

दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला

Next

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीवरून पक्षात असलेले मतभेद पुण्यात झालेल्या बैठकीत शनिवारी चव्हाटयावर आले. डावखरे यांच्या नियुक्तीला विरोध करीत नाशिकच्या जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षांनी उपाध्यक्षासह विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पक्षाच्या युवक आघाडीच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले होते़ याच्या आढावा बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन अध्यक्ष निरंजन डावखरे व माजी अध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
उमेश पाटील यांचे भाषण सुरू असताना नाशिक युवक आघाडीचे अध्यक्ष धीरज मगर व उपाध्यक्ष वैभव देवरे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ यामुळे एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them tried to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.