एटीएसकडून दोघांना पिस्तुलांसह अटक

By admin | Published: October 17, 2015 02:58 AM2015-10-17T02:58:00+5:302015-10-17T02:58:00+5:30

दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने दोघांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत

Both of them were arrested by the ATS from the ATS | एटीएसकडून दोघांना पिस्तुलांसह अटक

एटीएसकडून दोघांना पिस्तुलांसह अटक

Next

पुणे : दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने दोघांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गहुंजे ग्रामपंचायतीमधील निवडणुकीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या खुनाचा कट आखल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.
सागर शांताराम सावंत (२८, रा. गहुंजे, ता. मावळ), नितीन पांडुरंग गव्हाळे (१९, रा. रमाबाईनगर झोपडपट्टी, आकुर्डी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. एटीएसला खबऱ्यामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार टिंगरेनगर रस्त्यावरील कीर्ती हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा लावला. त्या ठिकाणी सावंत आणि गव्हाळे या दोघांना पकडण्यात आले. सावंत याच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून, तो अखिल भारतीय सेनेचा सदस्य आहे.

Web Title: Both of them were arrested by the ATS from the ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.