गोवंश मांस विक्रीप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Published: October 24, 2016 04:56 AM2016-10-24T04:56:26+5:302016-10-24T04:56:26+5:30
हैदराबाद येथे गोवंश प्राण्यांचे मांस घेऊन जाणारा पीकअप टेम्पो आणि पाचशे किलो मांस असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला,
आश्वी (अहमदनगर) : हैदराबाद येथे गोवंश प्राण्यांचे मांस घेऊन जाणारा पीकअप टेम्पो आणि पाचशे किलो मांस असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला, तसेच या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. संगमनेर तालुका ग्रामीण पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली.
संगमनेर-लोणी रस्त्याने पोलीस गस्त घालत असताना, निमगावजाळी शिवारात एक पीकअप जीप संशयास्पदरीत्या उभी केलेली आढळून आली. गाडी चालकाकडे
चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता, त्याने संगमनेर येथील गुफरान नसीर कुरेशी
यांच्या कत्तलखान्यातून गोवंश प्राण्याचे मांस हैदराबाद येथे विक्रीस नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर, मुद्देमाल ताब्यात घेत, पोलिसांनी गुन्हा दाखल करून, चालक अमजद हुसेन शेख व मालक गुफरान नसीर कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली. (वार्ताहर)