वाजीदमागोमाग अन्य दोघेही परतणार

By admin | Published: December 25, 2015 04:21 AM2015-12-25T04:21:45+5:302015-12-25T04:21:45+5:30

दहशतवादीविरोधी पथकाने वाजीद शेख याला कर्नाटकातून आणल्यानंतर त्याच्यासोबत लपलेले नूर मोहम्मद व मोहसीन सय्यद हे दोघे दुसऱ्या दिवशी गुलबर्गा येथून परतत आहेत

Both of them will also return after the Wajid | वाजीदमागोमाग अन्य दोघेही परतणार

वाजीदमागोमाग अन्य दोघेही परतणार

Next

मुंबई : दहशतवादीविरोधी पथकाने वाजीद शेख याला कर्नाटकातून आणल्यानंतर त्याच्यासोबत लपलेले नूर मोहम्मद व मोहसीन सय्यद हे दोघे दुसऱ्या दिवशी गुलबर्गा येथून परतत आहेत. अटकेच्या भीतीने मोहसीन याने दोघांना आपल्यासोबत लपून राहण्याची सूचना केली होती, अशी माहिती ‘एटीएस’ने ‘लोकमत’ला दिली.
कुटुंबियांना विविध सबबी सांगत हे तिघेही १५ डिसेंबरपासून मालवणी भागातून बेपत्ता झाले होते. आपण नमाजला जात असून लवकरच परत येऊ, असे नूर मोहम्मदने आपल्या बायकोला सांगितले होते. तिघांनी मिळून चेन्नईला भेट दिली. त्यामागे मोहसीनची काही योजना होती, पण त्याने इतर दोघांना याबाबत काही सांगितले नव्हते.
दरम्यान, नूर गुलबर्गाहून परतला व आमच्याकडे आला, असे एटीएस अधिकऱ्यांनी सांगितले. मोहसीनही परत येईल अशी खात्री आहे.
एकदा तो आला की ते कशासाठी लपून बसले होते, याची शहानिशा केली जाईल. त्यानंतरच त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा
निर्णय घेण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
नूर मोहम्मंद पत्नी व चार मुलांसमवेत मालवणीतील अन्वर चाळीत भाड्याने राहतो. तो मूळचा अकोल्याचा असून त्याची पत्नी कर्नाटकातील आहे. त्याची पत्नी रहिमुन्नीसाने सांगितले की, माझी मोठी मुलगी आजारी असून मुले सारखी वडीलांची आठवण काढत होती. ते परत आले याचा मला आनंद असून त्यांना एटीएसचे अधिकारी घेऊन गेले आहेत.
नूरसोबत गवंडीकाम करणारा रशिद म्हणाला की, आपण सौदी अरेबियाला जाऊ इच्छितो, असे त्याने मला एकदा सांगितले होते. तो सरळमार्गी असून पाच वेळा प्रार्थना करणारा धार्मिक आहे. त्याच्या तोंडी इसिस वा जिहाद असे शब्द कधी ऐकले नाहीत. सौदीला गेल्यानंतर त्याच्या पत्नीसाठी काही काम बघ, असे त्याने मला सांगितले होते.

Web Title: Both of them will also return after the Wajid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.