दोन्ही वाहन परवाने प्रक्रिया आॅनलाईन
By admin | Published: December 16, 2015 12:01 AM2015-12-16T00:01:45+5:302015-12-16T00:07:42+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय : घरबसल्या पैसेही भरता येणार; थेट परीक्षेचीच वेळ मिळणार
कोल्हापूर : वाहन चारचाकी असो अथवा दुचाकी; वाहन चालविण्याचा परवाना अर्थात ‘शिकाऊ अनुज्ञप्ती’ व ‘पक्की अनुज्ञप्ती’साठी ‘सारथी ४.०’ या नव्या संगणक प्रणालीचा वापर राज्यात प्रथमच ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात २३ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
या प्रणालीत यापूर्वी केवळ शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसेन्स) करिता आॅनलाईन अपॉइंटमेंट ६६६.रं१३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावरून घ्यावी लागत होती. मात्र, आता यात बदल केला असून ६६६.स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरून सर्व शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती अर्थात वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. यात परवान्यासाठी लागणारे शुल्कही आॅनलाईन बँकिंगद्वारे स्टेट बँक आॅफ इंडियासह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अर्जदाराला भरता येणार आहे. याकरिता केवळ कार्यालयात येऊन तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. यात केवळ शुल्काव्यतिरिक्त पाच रुपये जादा भरावे लागणार आहेत. अर्जदाराने अर्ज भरताना लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आपले छायाचित्र व सही अपलोड करावी लागणार आहे. याशिवाय आधार कार्ड किंवा वयाचा दाखलाही अपलोड करावा लागणार आहे. सध्या पक्के व शिकाऊ असे प्रत्येकी १४० परवाने दररोज लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन या कार्यालयाकडून दिले जातात.
यापूर्वी केवळ लर्निंग लायसेन्ससाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करून परीक्षेची वेळ मिळविता येत होती. आता मात्र, प्रायोगिक तत्त्वावर राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर उपप्रादेशिक कार्यालयात दोन्ही परवाने नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर मिळणार आहेत. पैसेही रांगेत उभे राहून न भरता नेट बँकिंगद्वारे प्रथम स्टेट बँकेत भरावे लागणार आहेत.
- लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी