बाटलीबंद पाणी 'मिनरल वॉटर' नसते, जाणून घ्या सरकारी सत्यवचन ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:51 AM2019-09-25T11:51:33+5:302019-09-25T11:52:51+5:30
पुण्यातील येवले चहाने वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्यात आमच्याकडे चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते,
बाटलीबंद पाणी किंवा जारमधील पिण्याचे पाणी आपण मिनरल वॉटर म्हणून विकत घेतो आणि पीत असतो. मात्र, प्रत्येक बाटलीबंद पाणी हे मिनरल वॉटर नाही. कायद्याच्या चौकटीत मिनरल वॉटरची व्याख्या वेगळीच आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, दुकानात किंवा इतरत्र मिळणारे बाटलीबंद पाणी हे मिनरल वॉटर नाही, हेच सत्य आहे. कायद्यानुसार किंवा सरकारी दफ्तरातील मिनरल वॉटरच्या वाख्येनुसार ज्या पाण्यावर कुठलिही प्रकिया केली जात नाही, तेच मिनरल वॉटर असते.
पुण्यातील येवले चहाने वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्यात आमच्याकडे चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते, असे म्हटले होते. मात्र, एफडीआयमधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या चहा स्टॉलवर धाड मारल्यानंतर ही जाहीरात दिशाभूल करणारी असल्याचे एफडीएने म्हटले आहे. या प्रकरणी एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी येवले चहाला नोटीसही बजावली आहे. तसेच, अॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौंसिल ऑफ इंडियाकडे देखील तक्रार नोंदविल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार व रमाकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.
बाजारात मिळणारे विविध कंपन्यांच्या पाण्याला मिनरल वॉटर म्हणण्याची प्रथा रुढ झाली आहे. मात्र, कायद्यात मिनरल वॉटर आणि बाटलीबंद पाणी यांची व्याख्या वेगळी आहे. गंगोत्रीच्या खोऱ्यामधील नैसर्गिक पाण्याला मिनरल वॉटर म्हटले जाते. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. निसर्गत:च ते पाणी शुद्ध असते. इतर, ठिकाणचे बाटलीबंद पाणी हे प्रक्रियायुक्त असते, असे यावेळी सह आयुक्त संजय नारागुडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे, मिनरल वॉटरसंदर्भातील आपलाही समज चुकीचा ठरला असून जे गंगोत्री येथून मिळते, तेच फक्त मिनरल वॉटर आहे. तर, आपण विकत घेतो ते बाटलीबंद पाणी आहे.