मगर स्टेडियममध्ये उभारणार बॉक्सिंग रिंग
By admin | Published: April 29, 2016 02:12 AM2016-04-29T02:12:49+5:302016-04-29T02:12:49+5:30
अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये बॉक्सिंग रिंग बसविण्यात येत असून महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती समीर मासूळकर यांच्या हस्ते कामास प्रारंभ झाला.
नेहरुनगर : नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये बॉक्सिंग रिंग बसविण्यात येत असून महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती समीर मासूळकर यांच्या हस्ते कामास प्रारंभ झाला.
अॅनमेक इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी उपक्रमातून यासाठीचा खर्च करण्यात येत आहे.
या वेळी कंपनीचे संचालक व पिंपरी-चिंचवड बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद गायकवाड, संचालिका संगीता गायकवाड, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियोद्धे गोपाल देवांग, क्रीडा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक सौदागर शिंदे, वैशाली देवांग, हृषीकांत वचकल आदी उपस्थित होते. मैदानाच्या मोकळ्या जागेत रिंग बसविण्यात येत आहे. यामुळे शहरातील मुष्टियोद््ध्यांना सराव करण्यासाठी मदत होणार आहे.
या रिंगमुळे भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्यास मदत होईल, असे मत देवांग यांनी व्यक्त केले. मासूळकर म्हणाले, इतरही कंपन्यांनी खेळाडूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. (वार्ताहर)