बारावी परीक्षांवर बहिष्कार

By admin | Published: January 17, 2017 01:26 AM2017-01-17T01:26:24+5:302017-01-17T01:26:24+5:30

महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीने ठाम राहण्याचा निर्णय घेतला

Boycott of XII exams | बारावी परीक्षांवर बहिष्कार

बारावी परीक्षांवर बहिष्कार

Next


पुणे : विविध मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यावर महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीने ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन समितीने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालय व राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिले.
िसोमवारी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय ते आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय, विभाग, तुकड्या, वर्ग यांची अनुदानपात्र यादी, त्यासंबंधी अनुदानाची शंभर टक्के आर्थिक तरतूद करावी, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा दि. ८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. तोपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास परीक्षांवर बहिष्कार टाकला जाईल. याबाबतचे निवेदन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांना देण्यात आले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. तानाजी नाईक यांनी दिली.
>विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीच्या वतीने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालय आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर मोर्चा काढण्यात आला होता.या मागण्यांसाठी दि. ३० जानेवारीपासून राज्य मंडळाच्या विभागीय कार्यालयांवर मोर्चा काढून उत्तरपत्रिकांची प्रतीकात्मक होळी केली जाणार आहे. त्यानुसार ३० तारखेला पुणे, ३१ जानेवारीला नाशिक, १ फेबु्रवारीला औरंगाबाद, २ फेब्रुवारीला अमरावती, ४ फेब्रुवारीला लातूर, ६ व ७ फेब्रुवारीला अनुक्रमे मुंबई व कोल्हापूर, रत्नागिरी आणि १० तारखेला नागपूर येथे मोर्चा काढला जाणार आहे.

Web Title: Boycott of XII exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.