मित्राने केले तरुणीचे अपहरण
By Admin | Published: July 17, 2016 05:16 AM2016-07-17T05:16:44+5:302016-07-17T05:16:44+5:30
मैत्रीसंबंध तुटल्यानंतर दुरावलेल्या मैत्रिणीचे एका तरुणाने अपहरण केले. शनिवारी सायंकाळी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरू झालेल्या या प्रकरणाने धंतोली, अजनीसह शहर पोलीस
नागपूर : मैत्रीसंबंध तुटल्यानंतर दुरावलेल्या मैत्रिणीचे एका तरुणाने अपहरण केले. शनिवारी सायंकाळी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरू झालेल्या या प्रकरणाने धंतोली, अजनीसह शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडवून दिली.
पीडित तरुणी अजनीत राहते. काही दिवसांपूर्वी तिचे तिच्या मित्राशी असलेले संबंध तुटले. ती त्याला टाळू लागली. वारंवार प्रयत्न करूनही ती प्रतिसाद देत नसल्यामुळे तो संतापला. त्याने शनिवारी सायंकाळी तिचे एका मित्राच्या मदतीने अपहरण केले. रात्री ७ च्या सुमारास तिने आपल्या वडिलांना मोबाईलवर या अपहरणाची माहिती दिली. वडिलांनी लगेच अजनी ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर घटना धंतोलीतून घडल्याचे उघड झाल्याने धंतोलीसह गुन्हेशाखेचे विविध पथकही आरोपी आणि पीडित तरुणीच्या शोधासाठी कामी लागले. मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू होता.