ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरच्या घोषणेची अंमलबजावणी हवेतच

By admin | Published: April 18, 2016 01:17 AM2016-04-18T01:17:08+5:302016-04-18T01:17:08+5:30

चहा विकून सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याच्या कामगिरीची व जिद्दीची दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमनाथला शासनाच्या कमवा व शिका

Brand Ambassador's announcements must be implemented | ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरच्या घोषणेची अंमलबजावणी हवेतच

ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरच्या घोषणेची अंमलबजावणी हवेतच

Next

पुणे : चहा विकून सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याच्या कामगिरीची व जिद्दीची दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमनाथला शासनाच्या कमवा व शिका योजनेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली. मात्र, अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने सोमनाथशी याबाबत संपर्क साधलेला नाही.
सोमनाथ गिरम याने सदाशिव पेठेत चहाची टपरी टाकली. स्वत:चा खर्च भागवून मजुरी करणाऱ्या आई-वडिलांना मदत केली. याच दरम्यान सीए परीक्षेत यश संपादन केले. शिक्षणमंत्री तावडे यांनी सोमनाथला ‘कमवा व शिका’ योजनेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर करण्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

नसलेल्या योजनेचा
ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर ?
राज्यातील विद्यापीठांकडून विद्यापीठ स्तरावर स्वतंत्रपणे ‘कमवा व शिका’ योजना चालविली जाते. या योजनेसाठी लागणारा निधी विद्यापीठातर्फे खर्च केला जातो. शासनाकडून स्वतंत्रपणे कमवा व शिका योजना चालविली जात नाही, असे शासनाच्या अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे सोमनाथला विद्यापीठाच्या योजनेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर बनविणार की शासनातर्फे नवीन योजना सुरू करून त्या योजनेची जबाबदारी देणार, असा प्रश्न आहे.

Web Title: Brand Ambassador's announcements must be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.