ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला ब्रेक

By admin | Published: November 30, 2015 02:55 AM2015-11-30T02:55:40+5:302015-11-30T02:55:40+5:30

केंद्र सरकार ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ सुरू करणार आहे. त्यामुळे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या निधीला ‘ब्रेक’ लागला आहे

Break to the rural life mission | ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला ब्रेक

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला ब्रेक

Next

भीमगोंडा देसाई ,  कोल्हापूर
केंद्र सरकार ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ सुरू करणार आहे. त्यामुळे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या निधीला ‘ब्रेक’ लागला आहे. प्रशिक्षण संस्थांना देय असलेले ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, निधीच मिळाला नसल्यामुळे सर्व उपक्रम बंद आहेत.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी २०१३-१४ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी केंद्र सरकारकडून ७५ टक्के, तर राज्य शासनाकडून २५ टक्के निधी दिला जात होता. योजनेतील ‘एक कुटुंब, एक नोकरी’ या उपक्रमातून आठवी पास-नापास, आयटीआय, बारावी पास-नापास विद्यार्थ्यांना निवडलेल्या ट्रेंडचे ३० ते ४५ दिवसांपर्यंत तालुकास्तरावरच मोफत प्रशिक्षण दिले जात होते. प्रशिक्षित बेरोजगारांना विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून मुलाखतीद्वारे नोकरी दिली जात होती.
सन २०१४-१५ वर्षात १८ ते ३५ या वयोगटांतील दारिद्र्यरेषेखालील पाच हजार पात्र बेरोजगारांना नोकरी देण्याचे नियोजन केले. प्रत्येक ग्रामपंचायतीने कमीत कमी दहा दारिद्र्यरेषेखालील बेरोजगारांचे अर्ज घेतले. त्यानुसार तालुकानिहाय उद्दिष्ट्य देऊन सुमारे २५ हजार ९०० अर्ज संकलित केले. चांगला प्रतिसाद मिळाल्याने पाच हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचे नियोजन केले. पात्र बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्'ातील ११ स्वयंसेवी संस्थांची निवड केली. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना प्रशिक्षणही देण्यात आले; परंतु, या आर्थिक वर्षात निधी आला नाही.
त्यामुळे प्रशिक्षणही अर्धवट राहिले. प्रशिक्षण दिलेल्या संस्थांना ५० लाख रुपये देय आहे. संस्थाचालक प्रशिक्षण दिलेल्यांचे पैसे कधी मिळणार याच्या, तर निवडलेले बेरोजगार नोकरी कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Break to the rural life mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.